अंबाजोगाईत जनसहयोगची गांधीगिरी; रस्त्यावर पडलेल्या खड्यात लावली बेसरमाची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 06:33 PM2019-02-01T18:33:19+5:302019-02-01T18:35:40+5:30

बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने मानवलोक जनसहयोग व जेष्ठ नागरिकांनी आज सकाळी रस्त्यावरील खड्याना रांगोळी काढून त्यात बेसरमाच्या झाडांचे रोपण करून गांधीगिरी आंदोलन केले.

Gandhigiri of Janasahayog in Ambajogai; Sausage trees planted in the potwholes on the road | अंबाजोगाईत जनसहयोगची गांधीगिरी; रस्त्यावर पडलेल्या खड्यात लावली बेसरमाची झाडे

अंबाजोगाईत जनसहयोगची गांधीगिरी; रस्त्यावर पडलेल्या खड्यात लावली बेसरमाची झाडे

Next

अंबाजोगाई (बीड ) : अंबाजोगाईत मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा. अशी मागणी सातत्याने करूनही बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने मानवलोक जनसहयोग व जेष्ठ नागरिकांनी आज सकाळी रस्त्यावरील खड्याना रांगोळी काढून त्यात बेसरमाच्या झाडांचे रोपण करून गांधीगिरी आंदोलन केले.

शहरात मुख्य व इतर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. याचा मोठा त्रास शहरवासियांना सहन करावा लागतो. या खड्या मुळे अनेक लहान मोठे अपघात झाले. हे खड्डे बुजवावेत अशी मागणी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली. मात्र या मागणी ची दखल न घेतल्याने शुक्रवारी सकाळी गांधीगिरी आंदोलन छेडण्यात आले. या वेळी मानवलोक जनसहयोगचे कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक यांनी एकत्र येऊन रस्त्यावर पडलेल्या खड्या समोर रांगोळी काढली.व त्या खड्या मधे बेसरमाची झाडे लाउंन आपला निषेध नोंदवला.

या आंदोलनात धनराज मोरे,पुंडलिक पवार,भागवत कांबळे, लालसाहेब आगळे, नगरसेवक संतोष शिनगारे,दिनेश भराडिया,शाम सर्वदे,अमन लोहिया,डॉ.प्रवीण गुजर,व्ही डी शिंदे,विलास लोखंडे,रवि देशमुख,संजना आपेट,सावित्री सगरे, यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

 

Web Title: Gandhigiri of Janasahayog in Ambajogai; Sausage trees planted in the potwholes on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.