अंबाजोगाईत जनसहयोगची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:06 AM2019-02-02T00:06:45+5:302019-02-02T00:07:26+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाईत मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा, अशी मागणी सातत्याने करूनही बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने मानवलोक, जनसहयोग ...
अंबाजोगाई : अंबाजोगाईत मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा, अशी मागणी सातत्याने करूनही बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने मानवलोक, जनसहयोग व जेष्ठ नागरिकांनी शुक्र वारी सकाळी रस्त्यावरील खड्ड्याना रांगोळी काढून त्यात बेसरमाची झाडे लावून गांधीगिरी आंदोलन केले.
शहरात मुख्य व इतर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले. हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली. मात्र या मागणीची दखल न घेतल्याने शुक्र वारी सकाळी गांधीगिरी आंदोलन छेडण्यात आले. या वेळी मानवलोक जनसहयोगचे कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक यांनी एकत्र येऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यासमोर रांगोळी काढली व त्या खड्डयामध्ये बेसरमाची झाडे लावून आपला निषेध नोंदवला.
या आंदोलनात धनराज मोरे, पुंडलिक पवार, भागवत कांबळे, लालसाहेब आगळे, नगरसेवक संतोष शिनगारे, दिनेश भराडिया, शाम सरवदे, अमन लोहिया, डॉ.प्रवीण गुजर, व्ही.डी.शिंदे, विलास लोखंडे, रवि देशमुख, संजना आपेट, सावित्री सगरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.