विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:40 AM2021-09-07T04:40:17+5:302021-09-07T04:40:17+5:30

अंबाजोगाई : रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन शनिवारी ...

Ganesha idols of Shadu made by the students | विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती

विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूच्या गणेशमूर्ती

Next

अंबाजोगाई : रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. योगेश्वरी नूतन विद्यालयातील कलाशिक्षक गणेश कदम यांनी विद्यार्थ्यांकडून गणेशमूर्ती तयार करून घेतल्या. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही या कार्यशाळेत सहभाग नोंदवत मूर्ती साकारण्याचा आनंद लुटला. कलाशिक्षक कदम यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणपती कसा तयार करावा याची सविस्तर माहिती देत प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांच्याबरोबर विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत शाडूमातीचे सुमारे ५१ गणपती तयार केले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या शिक्षकांनीही गणेशमूर्ती साकारल्या. या उपक्रमासाठी रोटरीचे अध्यक्ष विवेक गंगणे, सचिव प्रा. रोहिणी पाठक, प्रकल्प संचालक हर्षवर्धन वडमारे, शाळेच्या संचालिका स्वरूपा कुलकर्णी, प्रज्ञा शेलमुकर,अमेय पाठक यांच्यासह शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते. ही कार्यशाळा ऑनलाईन ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग मिळाला. यावेळी कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.

050921\0748img-20210904-wa0212.jpg

गणेशमूर्ती बनविण्याच्या शाळेत सहभागी विद्यार्थी

Web Title: Ganesha idols of Shadu made by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.