गणेशोत्सवामुळे बाजारपेठ फुलली - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:04+5:302021-09-11T04:34:04+5:30
अंबाजोगाई : बाप्पांच्या स्वागतासाठी अंबानगरी सज्ज झाली असून, बाजारपेठेत सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गुरुवारी बाजारपेठेत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली. मंडीबाजार, ...
अंबाजोगाई : बाप्पांच्या स्वागतासाठी अंबानगरी सज्ज झाली असून, बाजारपेठेत सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गुरुवारी बाजारपेठेत गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली. मंडीबाजार, गुरुवार पेठ या परिसरांत खरेदीचा उत्साह होता. शहरात अनेकांनी आपल्या बाप्पांच्या मूर्तीची ऑर्डर देऊन बुक करून ठेवल्या आहेत. गुरुवारी अनेकांनी मूर्ती कुटुंबासह येऊन ठरविल्या. त्यामुळे मूर्ती विक्रीची दुकानेही गर्दीने फुलले आहेत.श्री गणेशाच्या आगमनासाठीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मोतीहार, झेंडू फुलांच्या माळा, झुंबर, डिस्को फॉल, झेंडू लटकन, मेटल बॉल, मेटल चेन, स्टेप बॉल, कागदी पंखा, मेटल पंखा, चंद्राहार, गौरी सेट, बाजू बंद, मंगळसूत्र, बोरमाळ, किरीट, फ्रुट लड्डी, वेलवेट बॉल, काचबॉल, फुल्ल लडी, चुनरी, फुल छत्री, गारलीन, सॅटीनचे पडदे आदी सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे बाजारात उत्साही वातावरण निर्माण होत आहे. विविधरंगी विद्युत माळांचे आकर्षण विविध रंगांच्या विद्युत माळा, विविध रंगाचे बल्ब, लेसर बल्ब खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. रंगीबेरंगी पडदे, लाकडी चौरंग, मंदिराच्या प्रतिकृती विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. चांदीचे मोदक, त्रिशुल, सुपारी पानाची प्रतिकृती, डोक्यावरील मुकुट, दुर्वा अशा वस्तूंना मागणी आहे. गणेशोत्सवासाठी बाजारात विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य आले आहे. अगदी २० ते २५०० रुपयांपर्यंत या साहित्याच्या किमती असल्याचे विक्रेते चंद्रशेखर गुप्ता यांनी सांगितले.
090921\025420210909_182913.jpg
दुकाने सजली