नवगण राजुरीचा गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:32 AM2021-09-13T04:32:26+5:302021-09-13T04:32:26+5:30
एकच संपूर्ण मूर्ती व चारी बाजूला चार गजाननाचे अतिशय सुंदर रूप हे पाहून आपोआपच दोन्ही हात जोडले जातात. गावाच्या ...
एकच संपूर्ण मूर्ती व चारी बाजूला चार गजाननाचे अतिशय सुंदर रूप हे पाहून आपोआपच दोन्ही हात जोडले जातात.
गावाच्या सीमेवर चार गणपती व मंदिरात पाच गणपती आहेत. म्हणूनच या गावाला नवगण राजुरी असे म्हणतात.
मंदिरातील मूर्ती म्हणजेच एका सुंदरशा चौकोनी दगडी चौथऱ्यावर. एकमेकांकडे पाठ केलेल्या चार मूर्ती आहेत.
१) पूर्वेकडे मुख असलेले महामंगल गणराय, महामंगलेश्वर
२) पश्चिमेकडे मुख असलेले शेशाब्धिष्ठित गणराय.
३) उत्तरेकडील मुख असलेले उतिष्ट गणराय.
४) तर दक्षिणेकडे मुख असलेले मयुरेश्वर गणराय.
असे हे चार गणपती आहेत.
गावाच्या चारही सीमावर शेंदूर लावलेले चार गणपती आहेत.
मुख्य मूर्ती वेगवेगळ्या विशिष्ट आसनावर किमान अंदाजे पाच फुट उंचीच्या आहेत.
गणपतीसमोर शंकराच्या नंदीप्रमाणे मुषकराज विराजमान आहेत. गणेश स्तोत्र लिहिलेल्या स्तंभाच्या वरच्या अंगास पाठीला पाठ लावून चारही दिशाकडे मुख असलेल्या चार भव्य. सुंदर मूर्ती आहेत.
‘देव पूजोनी पहावा..
परी
अंतरी साठवावा’
याप्रमाणे गणरायाची सुंदर मूर्ती भाविकांनी अंतःकरणातुन साठवून ठेवली आहे.
120921\12_2_bed_11_12092021_14.jpeg
नवगण राजुरी