रेमडेसिविर वाटपावरून अधिकाऱ्यांंना गराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:36 AM2021-04-23T04:36:24+5:302021-04-23T04:36:24+5:30

बीड : रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटप व इतर प्रश्नांबाबत गुरुवारी दुपारी आमदार सुरेश धस व समर्थकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच अधिकाऱ्यांना गराडा ...

Garada to the authorities from the distribution of Remedesivir | रेमडेसिविर वाटपावरून अधिकाऱ्यांंना गराडा

रेमडेसिविर वाटपावरून अधिकाऱ्यांंना गराडा

Next

बीड : रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटप व इतर प्रश्नांबाबत गुरुवारी दुपारी आमदार सुरेश धस व समर्थकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच अधिकाऱ्यांना गराडा घातला. यावेळी रेमडेसिविर इंजेक्शन वाटपात हालगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांची धावपळ कायम आहे. त्यातच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून रोज नवीन ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध होईल, असे आदेश काढले जात आहेत. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन वाटपात हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. यावेळी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेण्यात आले. यावेळी वाटप सुरळीत करण्यात येईल. त्यासाठी वाटपाचे नियंत्रण अधिकारी बदलू, असे आश्वासन जिल्हाधिकारी रवींंद्र जगताप यांनी दिले.

रेमडेसिविर वाटपाचे नियंत्रण औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्याकडे आहे. आष्टीसह इतर तालुक्यांतील रुग्णांना देखील रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी बीड येथे यावे लागते. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. वेळोवेळी सूचना देऊनदेखील आष्टी-पाटोदा व शिरूर कासार येथील रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागप्रमुख इम्रान हाश्मी व औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांच्याशी संपर्क केला तर फोन उचलत नाहीत. त्यामुळे धस यांंनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या दालनात त्यांना बोलावून घेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, जिल्हाधिकारी जगताप यांनी सर्वांना मिळून या संकटाचा सामना करायचा आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक आर. राजा, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, अन्न व औषध सहायक आयुक्त इम्रान हाश्मी, औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अशोक हिंगे व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

आष्टी, पाटोदा, शिरूर पाकव्याप्त काश्मीर आहे का ?

आष्टी, पाटोदा व शिरूर कासार याठिकाणी देखील कोरोना रुग्णालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्याठिकाणी मागणी करूनदेखील रेमडेसिविर इंजेक्शन दिले जात नाहीत. हा भाग पाकव्याप्त काश्मीर आहे का? असा सवाल आ. सुरेश धस यांनी यावेळी प्रशासनाला केला.

....

===Photopath===

220421\22_2_bed_24_22042021_14.jpg

===Caption===

जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आ. सुरश धस जिल्हाधिकारी रविंद्र जगताप व इतर अधिकारी 

Web Title: Garada to the authorities from the distribution of Remedesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.