क्रीडा संकुल परिसरात कचऱ्याचे ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:48+5:302021-05-05T04:55:48+5:30
बीड : शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील नाल्यांची वेळेवर साफसफाई करण्यात येत नाही. गोदामाच्या जागेवर कचरा आणून टाकला जात ...
बीड : शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील नाल्यांची वेळेवर साफसफाई करण्यात येत नाही. गोदामाच्या जागेवर कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे
रस्त्यावर खड्डेच खड्डे
वडवणी : तालुक्यातील चिंचाळा ते परडी माटेगाव हा रस्ता सध्या उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. तसेच या रस्त्यावरून शेतकऱ्यांची वर्दळ असते. त्यांनाही त्रास होत आहे. त्यामुळे रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.
रात्रीची गस्त सुरू करा
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात लहान-मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अनेक वसाहतीत असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
खड्ड्यांतून वाहतूक
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण परिसरात टाकरवण फाटा-राजेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच खड्ड्येमय रस्त्यांवरून वाहने वाहतूक करीत आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
रानडुकरांची धास्ती
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. शेतात रानडुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहेत. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.