गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८८६ रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:39 AM2021-08-20T04:39:27+5:302021-08-20T04:39:27+5:30
महिना दर (रुपयांत) जानेवारी - ...
महिना दर (रुपयांत)
जानेवारी - ७२९
फेब्रुवारी - ७४५
मार्च - ८३४
एप्रिल - ८३५
मे - ८२४
जून - ८२४
जुलै- ८६०
ऑगस्ट - ८८६
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत गॅस सिलिंडर २२५ रुपयांनी वाढले होते. मे २०२०पासून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर सबसिडी नाममात्र असल्याने पूर्वीप्रमाणे ३५० रुपये मिळणारी सबसिडी जवळपास बंदच झाली आहे. सिलिंडरची दरवाढ मात्र दर महिन्याला होत आहे. जानेवारीत ७२९ रुपये दर होते. फेब्रुवारीत १६ रुपयांनी वाढले. मार्चमध्ये मात्र संथगतीने ८९ रुपयांपर्यंत मोठी दरवाढ झाली. त्यानंतर स्थिरावलेले दर पुन्हा कमालीचे वाढले आहे.
छोटे सिलिंडर दरही वाढतेच
घरगुती वापरासाठी १४.२ किलोचे व ५ किलोचे छोटे गॅस सिलिंडर मिळते. घरगुती सिलिंडर छोटा वा मोठा असो दर मात्र सारखेच मोजावे लागतात. त्यामुळे छोट्या सिलिंडरचे दरही स्थिर नाहीत. १९ ऑगस्ट रोजी याचे दर ३२८ रूपये होते. मोठ्या सिलिंडरच्या तुलनेत ते महागच ठरते.
व्यावसायिक सिलिंडर तीन रुपयांनी स्वस्त
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही टप्पटप्प्याने वाढतच आहेत. एकीकडे घरगुती सिलिंडर २५ रुपयांनी महाग झाले तर दुसरीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तीन रुपयांची कपात झली आहे. १ ऑगस्ट रोजी व्यावसायिक सिलिंडरचे दर १६९५ रुपये होते. १९ ऑगस्ट रोजी हे दर १६९२ रुपये झाले.
शहरात चुली कशा पेटवायच्या?
कोरोनाकाळात सर्वच जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ अत्यंत त्रासदायक झाली आहे. खाद्यतेल गगनाला भिडले आहे. यातच गॅसचे दर वाढल्याने सगळी संकटे एकाच वेळी आल्यासारखे वाटते. सरकारने भाववाढ नियंत्रणात आणली पाहिजे.
- वंदना अमोल विप्र, गृहिणी, बीड.
----------
वाढत्या महागाईमुळे खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयांचे हाल होत आहेत, याकडे सरकारचे लक्ष नाही. तेल, डाळी, गॅस सगळेच महाग झाले. चुलीवर स्वयंपाक करावा तर लाकडेदेखील आणायची कुठून? महागाईमुळे सर्वच लोक त्रस्त झाले आहेत.
-- संगीता स्वामी, गृहिणी, बीड.
--------