एक वर्षात गॅस सिलिंडर २४० रुपयांनी वाढले; सबसिडी मिळते केवळ दहा रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:24 AM2021-07-16T04:24:18+5:302021-07-16T04:24:18+5:30

महिना सिलिंडरचे दर सबसिडी ...

Gas cylinders increased by Rs 240 in one year; The subsidy is only Rs | एक वर्षात गॅस सिलिंडर २४० रुपयांनी वाढले; सबसिडी मिळते केवळ दहा रुपये

एक वर्षात गॅस सिलिंडर २४० रुपयांनी वाढले; सबसिडी मिळते केवळ दहा रुपये

Next

महिना सिलिंडरचे दर सबसिडी

जुलै २०२० ६२० ९.९५

ऑगस्ट ६२० ९.९५

सप्टेंबर ६२० ९.९५

ऑक्टोबर ६२० ९.९५

नोव्हेंबर ६२० ९.९५

डिसेंबर ६३० ९.९५

जानेवारी ७०० ९.९५

फेब्रुवारी ७६२ ९.९५

मार्च ८२० ९.९५

एप्रिल ८३५ ९.९५

मे ८४५ ९.९५

जून ८४५ ९.९५

जुलै २०२१ ८६१ ९.९५

----------

सामान्यांनी जगायचे कसे

दिवसेंदिवस महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंब त्रस्त झाली आहेत. वर्षभरात गॅसचे भाव दीड पटीने वाढले. कोरोनामुळे व्यवसाय कोलमडले आहेत. दरराेजचे उत्पन्न घटले आहे. डिझेलने शंभरी गाठली. गोडेतेल १०० रुपये झाले, त्यात गॅस सिलिंडरसाठी ९०० रुपये मोजावे लागतात. अशा महागाईत सामान्यांनी जगायचे कसे? -- सविता प्रीतम शिंदे, बीड.

शहरात चूलही पेटविता येत नाही

दररोज लागणारा भाजीपाला, किराणा दिवसेंदिवस महाग होत चालल्याने आर्थिक गणित बिघडले आहे. उसनवार करून घरप्रपंच चालविण्याची वेळ आली आहे. यातच कोरोनामुळे खर्च वाढले आणि कुटुंबप्रमुखाचे पगार कमी झाले तर काहींच्या नोकऱ्या गेल्या. त्यांनी घर कसे चालवायचे? शहरीकरणामुळे घरे पाहता चूलही पेटवता येत नाही, अशी स्थिती आहे. --- मीरा वसंत पवार, बीड.

Web Title: Gas cylinders increased by Rs 240 in one year; The subsidy is only Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.