गॅसचा भडका; सून मयत तर सासू-सासरे भाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:29 AM2019-04-16T00:29:56+5:302019-04-16T00:31:48+5:30

बीड : गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका झाला. यमध्ये गंभीररित्या भाजलेल्या सुनेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तिचे ...

Gasoline; After the death of mother-in-law and mother-in-law, she got burnt | गॅसचा भडका; सून मयत तर सासू-सासरे भाजले

गॅसचा भडका; सून मयत तर सासू-सासरे भाजले

Next
ठळक मुद्देपाचेगावातील घटना : जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

बीड : गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका झाला. यमध्ये गंभीररित्या भाजलेल्या सुनेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तिचे सासु-सासरे तिला वाचविताना गंभीर भाजले. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे घटना घडली.
जयश्री शेळके (२२) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर सासु मुक्ताबाई शेळके (६०), सासरे आत्माराम शेळके (६५ सर्व रा.पाचेगाव ता.गेवराई) हे गंभीररीत्या भाजले आहेत. सोमवारी सकाळीच जयश्री स्वयंपाक करण्यासाठी गॅसकडे गेली. याचवेळी अचानक गॅसचा भडका झाला आणि यात तिच्या साडीने पेट घेतला. ती ओरडल्याने सासू मुक्ताबाई धावल्या. यामध्ये त्याही भाजल्या गेल्या. दोघींच्या ओरडण्याने सासरे आत्मारामही धावले. या घटनेत जयश्री ९०, मुक्ताबाई ६० तर आत्माराम २० टक्के भाजले होते. परिसरातील लोकांनी या तिघांनाही तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच दुपारच्या सुमारास जयश्रीने अखेराचा श्वास घेतला. सासु-सासऱ्यांवर उपचार सुरूच असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जयश्रीच्या आईने जबाब दिला असून तिची कोणाविरोधातही तक्रार नसल्याचे पोलीस चौकीतील पोह. ससाने यांनी सांगितले.

Web Title: Gasoline; After the death of mother-in-law and mother-in-law, she got burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.