टपऱ्यांमध्ये पेट्रोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:12+5:302021-01-13T05:29:12+5:30
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असलेल्या पानटपऱ्या व विविध दुकानांमध्ये पेट्रोलची खुलेआम विक्री केली जाते. तालुक्याच्या ठिकाणांहून अथवा जवळ ...
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असलेल्या पानटपऱ्या व विविध दुकानांमध्ये पेट्रोलची खुलेआम विक्री केली जाते. तालुक्याच्या ठिकाणांहून अथवा जवळ असलेल्या पेट्रोल पंपावरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणले जाते व या पेट्रोलमध्ये भेसळ करून ते चढ्या भावाने विकले जाते.
स्वच्छतेविना दुर्गंधी
बीड : शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील नाल्यांची वेळेवर साफसफाई करण्यात येत नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. धान्य गोदामाच्या जागेवर कचरा आणून टाकला जात आहे. हा कचरा उचलला जात नसल्याने ढीग साचून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे त्रास वाढला आहे.
रस्त्याची दुरवस्था
केज : तालुक्यातील शिरूरघाट ते केज या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी रस्ता दुरुस्तीसंदर्भात मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
उघड्या रोहित्राचा धोका
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील मोंढा परिसरात असलेले विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज फुटलेले आहेत. तुटक्या फ्यूजआधारे वीजपुरवठा सुरू आहे. रोहित्र उघडे असल्याने या परिसरात अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. तातडीने नवे फ्यूज बसवण्याची मागणी होत आहे.