गेवराईत अट्टल गुन्हेगारांच्या बायकाही पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:11 AM2017-12-11T01:11:01+5:302017-12-11T01:11:06+5:30

गेवराई येथील बसस्थानकावर बसमध्ये चढणा-या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळणा-या अट्टल गुन्हेगारांच्या पत्नीला गेवराई पोलीस व प्रवाशांनी रंगेहाथ पकडले. तीन पैकी एक महिला चोरी पळून जाण्यात यशस्वी झाली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Geetai's infamous criminal's wife is also in the custody of the police | गेवराईत अट्टल गुन्हेगारांच्या बायकाही पोलिसांच्या जाळ्यात

गेवराईत अट्टल गुन्हेगारांच्या बायकाही पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलेची पर्स चोरताना रंगेहाथ पकडले

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : येथील बसस्थानकावर बसमध्ये चढणा-या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळणा-या अट्टल गुन्हेगारांच्या पत्नीला गेवराई पोलीस व प्रवाशांनी रंगेहाथ पकडले. तीन पैकी एक महिला चोरी पळून जाण्यात यशस्वी झाली. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील सुबाना ईस्माईल शेख या त्यांच्या भाच्याच्या लग्नाला औरंगाबाद येथे जाण्यासाठी आईसोबत शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गेवराई बसस्थानकावर आल्या होत्या. अकल्लकोट - औरंगाबाद बसमध्ये चढत असताना त्यांच्या बॅगमध्ये एका महिलेने हात घातल्याचे त्यांनी पहिले. सुबाना शेख यांनी त्या महिलेचा हात धरून चोर चोर असे ओरडू लागताच तिने हाताला झटका देऊन बॅगमधील पर्स घेऊन पळ काढला. सदरील पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकत्रित ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. यावेळी पर्स घेऊन पळून गेलेल्या महिलेच्या आणखी दोन साथीदार महिलांना पळून जाताना तिथे असलेल्या प्रवाशांनी अडविले आणि पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले. मात्र आधीची महिला पर्स घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाली. पकडलेल्या महिलांची नावे सोनी जावेद चव्हाण, रोहिणी शहादेव चव्हान आणि शिवकण्या नारायण पवार (दोघी रा. खामगाव) अशी आहेत. यातील शिवकन्या (रा. रेवकी शिवार) पळून जाण्यात यशस्वी झाली. याप्रकरणी सुबाना शेख यांच्या फियार्दीवरून तिन्ही महिलांवर गेवराई ठाण्यात गीन्हा दाखल करण्यात आला.

महिलांचीही टोळी
बसस्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाचा फायदा घेऊन चोरी करणाºया या महिलांची टोळी आहे. यातील दोघी ताब्यात घेतल्या असून एक फरार झाली असली तरी तिलाही लवकरच ताब्यात घेऊ, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या सर्व महिला ‘व्हीआयपी’ साड्या परिधान करून चोरी करीत असल्याचे समोर आले आहे.

पतींच्या आवळल्या मुसक्या
साधारण तीन महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे एलसीबीत असताना आष्टी तालुक्यात त्यांनी भर पावसात चिखल तुडवीत तीन कि़मी.जावून नारायण पवारच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर जावेदलाही त्यांनी जेरबंद केले होते. हे सर्व अट्टल गुन्हेगार आहेत. आहेर यांनी त्यांच्या तर मुसक्या आवळल्याच परंतु आता त्यांच्या पत्नींच्या टोळीलाही जेरबंद केले.

Web Title: Geetai's infamous criminal's wife is also in the custody of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.