सर्वसाधारण सभा; काका-पुतण्याचे ‘ऑनलाईन’ वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:47+5:302021-09-08T04:40:47+5:30

बीड : येथील पालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी ऑनलाईन पार पडली. या सभेतही नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व उपनगराध्यक्ष हेमंत ...

General meeting; Uncle-nephew's 'online' argument | सर्वसाधारण सभा; काका-पुतण्याचे ‘ऑनलाईन’ वाद

सर्वसाधारण सभा; काका-पुतण्याचे ‘ऑनलाईन’ वाद

Next

बीड : येथील पालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी ऑनलाईन पार पडली. या सभेतही नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर या काका-पुतण्यात प्रस्ताव वाचनावरून वाद झाले. नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी प्रसिद्धिपत्रक काढत उपनगराध्यक्षाला खडे बोल सुनावल्याचे सांगतात. तर उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागरांनीही निधी हडपण्याचा डाव उधळून लावल्याचा आरोप केला. या दोघांच्या वादाचे सत्र मंगळवारीही कायम होते.

या विषयांचे झाले वाचन

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १०१ (६) नुसार वेळोवेळी बदल किंवा फेरफार करणे बाबत, नदी संवर्धन योजने अंतर्गत बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा व करपरा नदीचे सुशोभीकरण करणे बाबत, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना, दलितेतर सुधार योजना, जिल्हा नगरोत्थान योजना, नगर परिषद फंड व शासनाच्या विविध योजनेअंतर्गत विकास कामांना मान्यतेबाबत, शहरातील बंद पथदिवे काढणे व त्या जागी नवीन पथदिवे बसवणे, नगरपरिषद अधिनस्त असलेल्या इमारती, कंपोस्ड डेपो, उद्याने व इतर आवश्यक ठिकाणी साहित्यासह विद्युत व्यवस्था करणेकरिता निविदा प्रक्रिया राबविणे, बीड शहरातील विविध ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी बसविण्याकरिता ई-निविदा करणेबाबत, पालिकेच्या मालकीच्या बोर्डवर विद्युत पंप बसविणे बाबत, भांडार विभागांतर्गत वाहनांकरिता टायर खरेदीबाबत, शहरातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रस्ते जोडणीबाबत इत्यादी ठरावांचे वाचन करण्यात आले.

काय म्हणतात नगराध्यक्ष...

बीड शहरातील प्रस्तावित कामाचे वाचन करत असताना उपनगराध्यक्षांनी विरोध दर्शविला असता नगराध्यक्षांनी विरोधकांनो शहरातील विकास कामांत खोडा घालू नका, असे म्हणत खडे बोल सुनावले. सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या सर्व ठरावांना आणि प्रस्तावित कामांना सर्व नगरसेवकांनी एकमताने संमती दर्शवली, असे पत्रक डॉ. नगराध्यक्षांच्यावतीने काढले आहे.

काय म्हणतात उपनगराध्यक्ष...

नगरपालिकेने आणि नगराध्यक्षांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गुंठेवारीच्या माध्यमातून आलेले १० कोटी रुपये बांधकाम खात्याला वर्ग करून डाव उधळून लावला. शहरातील अंधार दूर करा, पाणी, विजेच्या सुविधा जनतेला द्या, अशी मागणी केल्याचे पत्रक उपनगराध्यक्षांच्यावतीने काढले आहे.

Web Title: General meeting; Uncle-nephew's 'online' argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.