गेवराईत शेतक-यांचा आक्रोश महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:28 AM2017-12-14T00:28:23+5:302017-12-14T00:28:51+5:30
कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतक-यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा आदी मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने बुधवारी शेतकरी आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या
शेतक-यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा आदी मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने बुधवारी शेतकरी आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.
शिवसेना कार्यालयापासून पंचायत समिती रोड, जुने बसस्थानक, शास्त्री चौक, दाभाडे गल्ली मार्गे हा आक्रोेश महामोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात माजी मंत्री बदामराव पंडित, जि प.सभापती युधाजित पंडित, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, पं. स.चे सभापती अभिजित पंडित, शिवसेनेचे तालुका प्रमुख अजय दाभाडे, रोहित पंडित, बप्पासाहेब तळेकर, युवराज डोंगरे, विजयकुमार वाव्हळ, शेख एजाज, उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, बापूराव चव्हाण, महादेव औटी, बालासाहेब पाणखडे, पूजा मोरे, कादर पटेल, गणेश उगले, पंढरीनाथ लगड, भगवानराव खेडकर, डॉ. दिलीपराव शिंदे, कालिदास नवले, जहुर काझी, संभाजी नाटकर, जयदीप औटीसह तालुक्यातील शेतकरी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.
मोर्चात शेतकरी बैलगाडीवर कापूस व ऊस लावून सहभागी झाले होते. शासनाच्या विरोधात घोषणा देत शहरातील विविध मार्गाने मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
बोंडअळीमुळे तालुक्यातील शेतक-यांचे नुकसान झालेल्या कापसाचे तात्काळ पंचनामे करून सरसकट २५ हजार रुपये प्रतिहेक्टर नुकसान भरपाई द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा, शेतक-यांची वीज जोडणी तोडू नये, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.