अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:35 AM2021-02-20T05:35:38+5:302021-02-20T05:35:38+5:30

अंबाजोगाई : रस्त्याच्या रखडलेल्या कामाने व वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींनी अंबाजोगाई व परिसरात अपघातांचे सत्र ...

Get the road work done quickly to prevent accidents | अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा

अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा

Next

अंबाजोगाई : रस्त्याच्या रखडलेल्या कामाने व वाढत्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गैरसोयींनी अंबाजोगाई व परिसरात अपघातांचे सत्र वाढले आहे. ते रोखण्यासाठी रखडलेले रस्त्याचे काम लवकर मार्गी लावा,अशी सूचना आ. नमिता मुंदडा यांनी केली.

येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने आ. नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी आ. मुंदडा बोलत होत्या. या बैठकीस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव, एच. पी. एम. कंपनीचे संचालक अजय देशमुख, तांत्रिक सल्लागार रविकुमार, अभियंता निवृत्ती शिंदे, विकास देवळे यांची उपस्थिती होती. या बैठकीत आ. नमिता मुंदडा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे विविध समस्यांवर लक्ष वेधले.

या बैठकीत कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांनी पिंपळा ते मांजरसुंबा या रस्त्याच्या ८२ किमीपैकी ७५ किमी. काम पूर्ण झाल्याचे सांगितले. आ. नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी या बैठकीत दिले. या बैठकीस सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख, अ‍ॅड. संतोष लोमटे, अनंत आरसुडे, अमोल जाधव, रमाकांत पाटील, अभिजित जगताप, रमाकांत उडाणशिव यांची उपस्थिती होती.

अडीच वर्षांपासून काम सुरू

पिंपळा ते मांजरसुंबा या ८२ किमी. लांबीच्या रस्त्याचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. अत्यंत मंद गतीने सुरू असलेल्या या कामामुळे रहदारीस मोठ्या अडथळे निर्माण होत आहेत. काम सुरू करण्याअगोदरच रस्त्यांवर खड्डे खोदून ठेवण्यात येत असल्याने याचा मोठा त्रास वाहनचालकांना होतो. रखडलेल्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी सूचना त्यांनी केली.

काम सुरू होईपर्यंत खड्डे खोदू नका

बैठकीत जिथे पुलाचे काम सुरू आहे, तिथे डांबरी रस्त्याचे वळणमार्ग करा. भाटुंबा व कळमअंबा येते चार नळ्यांचे पूल बांधावेत. नेकनूर व केज येथील रस्त्यांचे रुंदीकरण,अंबाजोगाई शहरात लोखंडी सावरगाव ते यशवंतराव चव्हाण चौक रस्त्याच्या चौपदरीकरणास परवानगी, शहरातील भगवानबाबा चौक व यशवंतराव चव्हाण चौकाचे सुशोभिकरण करावे, जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही. तोपर्यंत रस्ते खोदू नये अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

Web Title: Get the road work done quickly to prevent accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.