ऑनलाइन ‘रमी’चा तरुणाईला विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:34 AM2021-08-15T04:34:42+5:302021-08-15T04:34:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उजनी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सध्याच्या तरुणाईला मोबाईलचे व्यसन जडले आहे. इंटरनेटवर चालणारे ऑनलाईन रमीसारखे गेम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उजनी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सध्याच्या तरुणाईला मोबाईलचे व्यसन जडले आहे. इंटरनेटवर चालणारे ऑनलाईन रमीसारखे गेम खेळण्याचे वेड तरुण पिढीला आर्थिक नुकसान करणारे ठरत आहे.
मोबाईलवर खेळला जाणारा जुगाराचा एक प्रकार म्हणजे ‘रमी’. हातात असलेल्या मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळण्याचे अनेक अप्लिकेशन आता उपलब्ध झाले आहेत. व्यवसाय, नोकरीच्या ठिकाणाहून, घरात बसून अथवा
शेतामध्ये बसून अनेक जण एकत्र येऊन मोबाईलवरून ऑनलाइन ‘रमी’ खेळताना दिसत आहेत. अशाप्रकारे जुगार खेळविणाऱ्या विविध अप्लिकेशनच्या जाहिराती सर्रासपणे दूरचित्रवाणी, मोबाईलवर दाखवून तरुणाईला आकर्षित करीत आहेत. आतापर्यंत अनेक जण या ऑनलाइन जुगारामुळे कंगाल झाले आहेत. इयत्ता पाचवीपासून पुढील सर्वच विद्यार्थ्यांजवळ आता अँड्रॉइड मोबाईल दिसून येत आहेत. अल्पकाळ अभ्यास केल्यानंतर मुले मोबाईलमध्ये गेम खेळणे, व्हाॅट्सॲप, फेसबुक पाहणे यासोबतच आता ऑनलाइन रमीच्या नादाला लागत आहेत. अशा मोबाईल ॲपवर बंदी आणावी, अशी मागणी पालकातून आता जोर धरू लागली आहे.