दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे गेवराईत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 07:12 PM2018-08-21T19:12:54+5:302018-08-21T19:14:17+5:30
दिव्यांगांना स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातून ३ % निधी मिळावा या मागणीसाठी आज दुपारी १ वाजता आंदोलन करण्यात आले.
गेवराई (बीड ): प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांगांना स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातून ३ % निधी मिळावा या मागणीसाठी आज दुपारी १ वाजता आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या दिला.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या व इतर स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातुन ३ % निधी अंपग, मुकबधीर यानां देण्याची योजना आहे. मात्र हा निधी २०१४ पासून देण्यात आला नाही. या निधीच्या मागणीसाठी आज दुपारी प्रहार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी बागुल यांनी १५ संप्टेबरपर्यंत हा निधी वाटप करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात सुनिल ठोसर, राजेंद्र आडागळे,नंदकुमार झाडे यांच्यासह अनेक दिव्यांगांचा सहभाग होता.