गेवराई, आष्टीची काळजी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:39+5:302021-07-09T04:22:39+5:30
बीड : जिल्ह्यातील ४०५५ रुग्णांची तपासणी केली असता, त्यात १४८ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून ३९०७ जणांचा अहवाल निगेटिव्ह ...
बीड : जिल्ह्यातील ४०५५ रुग्णांची तपासणी केली असता, त्यात १४८ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले असून ३९०७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. आष्टी आणि गेवराईत वाढत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत नसून चिंताजनक स्थिती आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आष्टीत जाऊन संबंधित यंत्रणेची बैठक सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यामुळे लोकांचा मुक्तसंचार वाढला आहे. मास्क वापरला जात नाही, सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्यामुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.
गुरुवारी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील ५, आष्टी ४६, बीड १६, धारूर ६, गेवराई ३५, परळी १, केज १६, माजलगाव २, पाटोदा १२, शिरूर ७ आणि वडवणीला २ रुग्ण आढळून आले आहेत. आष्टी आणि गेवराईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनास विशेष काळजी घ्यावी लागेल.