गेवराईत बाजार समितीच्या फळे, भाजी मार्केटचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:31 AM2021-04-14T04:31:00+5:302021-04-14T04:31:00+5:30
गेवराई : व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही बाजार समितीच्या माध्यमातून दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी ...
गेवराई : व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनाही बाजार समितीच्या माध्यमातून दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळे व फळे-भाजीपाला मार्केट बांधकामाचा शुभारंभ मंगळवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि. प.चे सभापती बाळासाहेब मस्के, माजी सभापती कुमार ढाकणे, पांडुरंग कोळेकर, अप्पासाहेब खराद यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी पंडित म्हणाले की, शेतकरी व्यापारी बांधवांना आपला शेतीमाल आणि फळ-भाजीपाला थेट विक्री करण्यासाठी या मार्केटचा फायदा होणार आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, उपसभापती शामराव मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.
विविध सुविधांचा समावेश
११ कोटी ४३ लाख रुपये किमतीच्या या कामामध्ये मुख्य महामार्गावर व्यापारी गाळे, १ हजार मे. टन क्षमतेचे गोदाम, शेतकरी सभागृह, लिलाव शेड, सौर पथदिवे, कंपाऊंड वॉल, कार्यालयीन इमारत, भुईकाटा फाउंडेशन, मुख्य प्रवेशद्वार आदी कामांचा समावेश असल्याचे माजी आ. अमरसिंह पंडित म्हणाले.