गेवराईच्या नाट्यगृहास संगीतरत्न स्व. हमीदमियाँ पटेल यांचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:26 AM2020-12-26T04:26:19+5:302020-12-26T04:26:19+5:30
येथील तथास्तू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या बैठकीत समितीच्या वतीने येथील कोल्हेर रोडवर नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहाला ज्येष्ठ संगीतकार, ...
येथील तथास्तू सांस्कृतिक सभागृहात झालेल्या बैठकीत समितीच्या वतीने येथील कोल्हेर रोडवर नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहाला ज्येष्ठ संगीतकार, गायक आणि नाट्य कलावंत स्वर्गीय हमीदमियाँ पटेल यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव उपस्थित शेकडो नाट्यकलावंतांच्या वतीने मंजूर करण्यात आला. याबाबत गौरव सोहळा समितीचे निवेदन नगर परिषदेचे अध्यक्ष सुशील जवंजाळ, मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांना देण्यात आले. निवेदनामध्ये नाट्यगृहाला स्वर्गीय पटेल यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नाट्य कलावंत ॲड. सुभाष निकम, श्रीकृष्ण कणपुरे, प्रा. राजेंद्र बरकसे, प्रकाश भुते, प्रा. प्रमोद झेंडेकर, विष्णूप्रसाद खेत्रे, शाहीर विलास बापू सोनवणे, ज्ञानेश्वर मोटे, प्रशांत रुईकर, रंजित सराटे यांची उपस्थिती होती. निवेदनावर शेकडो नाट्यकलावंत, नाट्य रसिक, साहित्य, अध्यात्म व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.