गेवराईत ‘शुभकल्याण’चा पंचनामा; पोलिसांनी महत्वाचे दस्तावेज घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 07:09 PM2018-10-27T19:09:19+5:302018-10-27T19:10:51+5:30
जादा व्याजदाराचे आमिष दाखवून ठेविदारांना गंडा घालणाऱ्या उस्मानाबाद येथील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या गेवराईतील शाखेचा पंचनामा करण्यात आला.
गेवराई (बीड ) : जादा व्याजदाराचे आमिष दाखवून ठेविदारांना गंडा घालणाऱ्या उस्मानाबाद येथील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या गेवराईतील शाखेचा शनिवारी पंचनामा करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेन शाखेचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत महत्वाचे दस्ताऐवज तपासून ताब्यात घेतले.
गेवराई येथील शुभकल्याण मल्टीस्टेटच्या शाखेत मुदत व बचत असलेल्या १ कोटी १७ लाख रूपयांच्या ठेवी आडकलेल्या आहेत. बँकेने ठेवी बुडविल्याने ठेवीदारांनी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. शनिवारी पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गेवराईत धडकले. शाखेचे कुलूप तोडून त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली. तसेच शाखेतील तीजोरी सील केली. तसेच इतर दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. पोलीस उपनिरीक्षक खटके, पठान, घाडगे आदी कर्मचाऱ्यांनी हा पंचनामा केला.