गेवराईचा यशराज सागडे राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत खेळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:23 AM2021-02-19T04:23:09+5:302021-02-19T04:23:09+5:30
शहरातील शारदा विद्या मंदिरचा इयत्ता १०वीमधील यशराज हा शारदा स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल क्रीडांगणावर प्रशिक्षक ...
शहरातील शारदा विद्या मंदिरचा इयत्ता १०वीमधील यशराज हा शारदा स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल क्रीडांगणावर प्रशिक्षक विजय अपसिंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करीत आहे. जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हा निवड चाचणीतून लातूर विभागीय निवड चाचणीत सहभागी झाला होता. त्यातून विभागीय संघात प्रवेश मिळाला. पन्हाळा (कोल्हापूर) येथे १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान आयोजित महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर गट व्हॉलीबॉल निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेतून उत्कृष्ट खेळ केल्याने यशराज सागडे याची महाराष्ट्र संघात निवड झाली. तामिळनाडूमध्ये २८ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेत तो खेळणार आहे. अलिकडच्या काळात तालुक्यातून राष्ट्रीय व्हॉलीबॉलसाठी निवड होणारा यशराज हा एकमेव खेळाडू आहे. त्याच्या यशाबद्दल जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित, शारदा स्पोर्ट्स अकादमीचे कार्यवाह तथा म. रा. कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष, माजी आ. अमरसिंह पंडित, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव तथा राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा. गोपाल धांडे, प्राचार्या डॉ. रजनी शिखरे, अमृत डावकर, मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे, प्रा. राजेंद्र बरकसे, व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक विजय अपसिंगेकर, किसन सागडे, डॉ. केतन गायकवाड व महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी स्वागत केले आहे.