साडेचार हजार पशुधनाला मिळाले ‘राहत’मुळे जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:24 AM2019-04-21T00:24:56+5:302019-04-21T00:25:15+5:30
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे रबी व खरीप दोन्ही हंगामात पिकांची लागवड झाली नव्हती, त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार होता. तसेच डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जनावरं सांभाळणे कठीण झाले होते.
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस नसल्यामुळे रबी व खरीप दोन्ही हंगामात पिकांची लागवड झाली नव्हती, त्यामुळे चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार होता. तसेच डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे जनावरं सांभाळणे कठीण झाले होते. अनेक पशुपालक शेतकºयांनी कवडीमोल भावाने आपली जनावरे बाजारात विकली. त्यानंतर शासनाच्या वतीने गोशाळेच्या माध्यमातून बीड तालुक्यातील पालवन येथे ‘राहत’ शिबीर सुरु करण्यात आले. शिबिरामुळे १३ ते १४ गावांमधील साडेचार हजार जनावरांना जीवदान मिळाले आहे.
बीड शहराच्या आसपास बहूतांश गावांमधील शेती ही खडकाळ आहे. त्यामुळे पिकांपेक्षा शहर जवळ असल्यामुळे शेतकºयांमधून दुग्ध व्यवसायाला पसंती दिली जाते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चारा-पाण्याची टंचाई जाणवत होती. अनेक शेतकºयांना पशुधन कसे टिकवायचे, हा प्रश्न पडला होता. तसेच छावण्या सुरु करण्याचा शासनाचा निर्णय झालेला नव्हता. मात्र, पालवन परिसरातील राजेंद्र मस्के यांच्या गोशाळेच्या माध्यमातून ‘राहत’ शिबिराला मान्यता मिळाली व ते सुरु झाले. परिसरातील शेतकरी आपल्या बिºहाडासह या शिबिरावर राहायला आले. या राहत शिबिरामुळे पशुधन वाचल्याचे शेतकºयांमधून सांगण्यात आले.
शेतकºयांसाठी जेवण
बीड शहराच्या परिसरातील १३ ते १४ गावांमधील शेतकरी या राहत शिबिरात सहभागी झाले आहेत. अनेक जण मागील चार महिन्यापासून आपल्या कुटुंबासोबत तर काही जण जनावरांची देखरेख करण्यासाठी एक जण राहत शिबिरावर वास्तव्यास असतो. त्यांच्या जेवणाची व्यवस्था होत नसल्याचे दिसून आल्यानंतर राहत शिबिरावरच जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय राहत शिबिराचे चालक राजेंद्र मस्के यांनी घेतला आहे.
लसीकरणामुळे साथीचे रोग नाहीत
एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने जनावरे एकत्र आल्यानंतर साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते मात्र, त्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी लसीकरण केले जात आहे. त्यामुळे जनारवांचे स्वास्थ चांगले आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संतोष पालवे यांनी दिली.
गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग
राहत शिबिरावर पडलेल्या शेणावर प्रक्रिया करुन गांडूळ खत निर्मिती करण्यात येत आहे. या माध्यमातून उत्पादन कसे घ्यावे याचे प्रशिक्षण देखील राहत शिबिरावर शेतकºयांना दिले जात आहे. त्यामुळे शेतकºयांना दुग्ध व्यवसायासोबतच इतर पुरक व्यवसायातून आपली प्रगती साधता येणार आहे.
रोज लागतो ८५ टन चारा
साडेचार हजारांपेक्षा अधिक जनावरे असलेल्या राहत शिबिरात रोज ८५ टन चारा वाटप केला जातो. तसेच इतर राज्यातून मुर घास आणला असून त्याचे देखील वाटप केले जाते. तसेच जनावरांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक शेतकºयांसाठी पाण्याची व्यवस्था त्यांच्या जवळ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रोज सकाळी व संध्याकाळी येथील शेतकरी बीड शहरात दुधाची विक्री करतात. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळत असल्याचे शेतकºयांमधून सांगण्यात आले.