भावासोबत गुरे चारण्यास गेलेल्या मुलीचा तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 04:56 PM2021-10-08T16:56:37+5:302021-10-08T16:57:33+5:30
आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील घटना
कडा ( बीड ) : गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा पाण्यात तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना पाटसरा येथे शुक्रवारी उघडकीस आली आहे. नीता कुंडलिक साबळे ( १५ ) असे मृत मुलीचे नाव आहे.
पाटसरा येथील निती साबळे लहान भावासह गावापासून जवळच असलेल्या सुरूडी परिसरातील बुवासाहेब तलावाच्याजवळ गुरुवारी दुपारी गुरे चारण्यासाठी गेली होती. पण काही वेळाने ती अचानक दिसेनाशी झाली. यामुळे भाऊ एकटाच गुरे घेऊन घरी आला. नीता दिसली नसल्याने नातेवाईकांनी रात्रभर शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही.
शेवटी आज सकाळी तलाव परिसरात नातेवाईकांनी पाहणी केली. यावेळी तलावात नीताचा मृतदेह आढळून आला. आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे, पोलिस नाईक संतोष दराडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले; आधी पिके गेली आता वीज कोसळून १५ जनावरे दगावली
- पैशांपुढे नाते विसरले; अडीच लाखांसाठी आतेभावानेच काढला बहिणीचा काटा