भावी नवरदेवाला बदनामीकारक मॅसेज पाठवून युवतीचे लग्न मोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 20:04 IST2019-11-08T19:54:54+5:302019-11-08T20:04:50+5:30
मोबाईलवर अश्लील आणि बदनामीकारक मजकूर पाठविला.

भावी नवरदेवाला बदनामीकारक मॅसेज पाठवून युवतीचे लग्न मोडले
अंबाजोगाई : युवतीच्या भावी पतीच्या मोबाईलवर अश्लील आणि बदनामीकारक मजकूर पाठविणाऱ्या मोबाईलधारकावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील २१ वर्षीय युवतीचे लग्न शेजारच्या जिल्ह्यातील तरूणासोबत जमले होते. परंतु, एका मोबाईल क्रमांकावरून दि. १४ आॅक्टोबर रोजी त्या युवतीच्या भावी पतीच्या मोबाईलवर तिच्याबद्दल अश्लील आणि बदनामीकारक मजकूर पाठविला. यामुळे त्या युवतीचे लग्न मोडले आणि समाजात तिची बदनामी झाली. याप्रकरणी पिडीत युवतीने संबंधित मोबाईल क्रमांक धारकाविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक महादेव राऊत हे करत आहेत.