‘त्याʼ बालिकेच्या आईचा शोध लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:08+5:302021-07-14T04:39:08+5:30

कडा : बुधवारी मध्यरात्री स्त्री जातीचे नवजात बालक कडा धामणगांव रोडलगत असलेल्या देवीनिमगांव येथील देवीच्या मंदिर आवारात सोडून मातेने ...

The girl's mother was not found | ‘त्याʼ बालिकेच्या आईचा शोध लागेना

‘त्याʼ बालिकेच्या आईचा शोध लागेना

googlenewsNext

कडा : बुधवारी मध्यरात्री स्त्री जातीचे नवजात बालक कडा धामणगांव रोडलगत असलेल्या देवीनिमगांव येथील देवीच्या मंदिर आवारात सोडून मातेने धूम ठोकली. पण ही माता कोण, तिला कोणाची साथ? याचा उलगडा करूनʼ त्याʼ बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्या आईचा शोध लावण्याचे आव्हान अंभोरा पोलिसांसमोर आहे. असे असताना आठवडा झाला तरी याचे कसलेच धागेदोरे पोलिसांना लागले नसल्याने त्या मातेचा शोध लागेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बुधवारी मध्यरात्री आठ दिवसांच्या स्त्री जातीचे नवजात बालक बेवारस अवस्थेत रडताना आढळून आले. पोलीस घटनास्थळी आले. त्या नवजात मुलीची आष्टी ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली. शिरूर येथील दीपक नागरगोजे याच्या शांतीवनने बाळाची जबाबदारी स्वीकारली. अंभोरा पोलिसांनी अज्ञाताविरोधात पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल थोरवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

पण आता ते नवजात बालक कोणी सोडले, त्याची आई कोण आणि सोडले तर सुरक्षित ठिकाणच का? व कोणत्या कारणामुळे सोडले, याचा उलगाडा होऊन त्या बालिकेच्या आईचा शोध लावण्याचे आव्हान अंभोरा पोलिसांसमोर आहे. या घटनेला आठवडा झाला तरी कसलेच धागेदोरे मिळाले नसल्याने त्या नवजात बालिकेची आई पोलिसांना सापडणार का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अमोल साळवे, विजय डुकरे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकाॅन्स्टेबल व तपास अधिकारी दत्ता टकले यांना विचारले असता ते म्हणाले की, पोलीस ठाणेअंतर्गत येणारे तीन सरकारी दवाखाने व कडा येथील खासगी दवाखान्यात पत्र दिले आहे. अजून माहिती उपलब्ध झाली नसून या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. तपास चालू असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पोलिसांनी ठरवले तर तपास लागू शकतो.

Web Title: The girl's mother was not found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.