रोमिओंच्या त्रासाने मुली त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:38 AM2019-09-05T00:38:44+5:302019-09-05T00:39:40+5:30
विद्यार्थिंनीना सडकसख्याहरींकडून मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याने याचा परिणाम विद्यार्थिनींच्या मानसिकतेबरोबरच शिक्षणावर होत असल्याचे दिसून येत आहे.
आष्टी : शहरात अनेक महाविद्याल व नर्सिंग स्कूल असून पाच शाळा तर काही क्लासेस आहेत याठिकाणी शहरातील व बाहेर गावातील आणि परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी येतात. परंतु येणाऱ्या विद्यार्थिंनीना सडकसख्याहरींकडून मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याने याचा परिणाम विद्यार्थिनींच्या मानसिकतेबरोबरच शिक्षणावर होत असल्याचे दिसून येत आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ब्रीदवाक्य फक्त कागदावरच का ? पोलीस रोडरोमिओंचा बंदोबस्त करणार का, अशी विचारणा शहरातील व परिसरातील गावांतील पालकातून होत आहे.
आष्टी येथे बाहेरच्या गावातून शिक्षणासाठी येणाºया मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.आष्टी बसस्थानक पासून शाळा महाविद्यालय लांब अंतरावर असल्याने बसस्थानक पासून कन्या शाळा, गणेश विद्यालय, पंडित नेहरू विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय सह तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,भगवान कॉलेज, नर्सिंग कॉलेज, कृषी महाविद्यालय काही क्लासेस परिसरात रोडरोमिओ कडून बाईकवर ट्रिपलसीट येऊन कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, शिट्टी वाजविणे, अश्लील हावभाव करणे, मुलींची छेड काढणे असे अनेक प्रकार होत आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयीन तरुणींनी महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून दिले आहे.पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक तालुक्यात दामिनी पथक नियुक्त केले आहे. परंतु हे दामिनी पथक आष्टी शहरात कारवाई का करत नाही, असा सवाल आहे. या रोडरोमिओना पोलिसांनी वेळीच लगाम घातला नाही तर मुलींना शिक्षण घेणे बंद करावे लागेल, अशी स्थिती आहे. या रोमिओंवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पालकांतून होत आहे.