गित्तेंना सीएस पदावरून काढले; सुरेश साबळेंकडे पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:42+5:302021-06-11T04:23:42+5:30

बीड : प्रशासन आणि रुग्णसेवेतील हलगर्जी डॉ. सूर्यकांत गित्ते यांना चांगलीच अंगलट आली. शासनाने त्यांना चक्क जिल्हा शल्य चिकित्सक ...

Gitten removed from CS post; Suresh Sable takes over | गित्तेंना सीएस पदावरून काढले; सुरेश साबळेंकडे पदभार

गित्तेंना सीएस पदावरून काढले; सुरेश साबळेंकडे पदभार

Next

बीड : प्रशासन आणि रुग्णसेवेतील हलगर्जी डॉ. सूर्यकांत गित्ते यांना चांगलीच अंगलट आली. शासनाने त्यांना चक्क जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून काढले आहे. त्यांचा पदभार माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी पदभार हाती घेत कामकाजाला सुरुवातही केली. या प्रकाराने मात्र आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अशोक थोरात यांनी कोरोनाची पहिली लाट यशस्वी पार पाडली. त्यानंतर त्यांची बदली होऊन त्यांच्या जागी नेकनूरहून डॉ.सूर्यकांत गित्ते आले होते. सुरुवातीपासूनच त्यांच्या विरोधात तक्रारी वाढल्या, तसेच रुग्ण व नातेवाइकांकडून सुविधा, रुग्णसेवेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक पदावरून काढत लोखंडी सावरगाव येथे शिक्षक म्हणून नियुक्ती दिली आहे. विशेष म्हणजे तेथे त्यांना साधे विभाग प्रमुखही केलेले नाही.

दरम्यान, डॉ.गित्ते यांच्या जागी माजलगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुरुवारी रात्री लगेच जिल्हा रुग्णालय गाठत पदभार हाती घेतला. अचानक झालेल्या या निर्णयाने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

रुजू होण्यापूर्वी रुग्णांची तपासणी

डॉ.साबळे यांनी रुग्णालयात पाऊल ठेवताच वॉर्ड क्रमांक ६ मध्ये जाऊन रुग्णाची तपासणी केली. डॉ.गित्तेंनी रुजू झाल्यानंतरही अनेक दिवस वॉर्डमध्ये पाऊलही ठेवला नव्हता, तसेच तत्कालीन सीएस डॉ.अशोक थोरात यांनीही पदभार सोडण्यापूर्वी राऊंड घेतला होता. त्यामुळे आजही रुग्ण त्यांचे नाव घेतात.

गित्ते गेले, आता क्रमांक कोणाचा?

डॉ.सूर्यकांत गित्ते यांना केवळ जिल्हा रुग्णालयातील तक्रारी भोवल्या आहेत. विशेष म्हणजे येथील गलथान कारभारास केवळ अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड जबाबदार आहेत; परंतु डॉ.राठोड हे बाजूला राहिले आणि डॉ.गित्तेंचा बळी गेला. रुग्णसेवा आणि प्रशासनातील हलगर्जीला जेवढे डॉ. गित्ते जबाबदार होते, तेवढेच डॉ.राठोड देखील असून, त्यांचीही बदली करावी, अशी मागणी होत आहे.

साबळेही माजलगावात वादग्रस्त

डॉ.साबळे यांच्याविरोधातही तक्रारी झालेल्या आहेत. माजलगावात माता मृत्यू व इतर सेवांबद्दल तक्रारी वाढलेल्या आहेत. आता त्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत आरोग्य विभागाची प्रतिमा उंचवावी, तसेच रुग्णसेवा अधिक बळकट करावी, अशी मागणी होत आहे.

---

एसीएस माहिती असूनही आले नाहीत

डॉ.सुरेश साबळे हे कोरोना वॉर्डमध्ये जाणार, ही माहिती असतानाही डॉ.राठोड गेटकडे फिरकलेही नाही. आपल्या कक्षात बसून ते केवळ माहिती घेत होते. यावरून आताच अंतर्गत वाद पेटण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

--

मला रुग्णसेवा आणि प्रशासन सुधारायचे आहे. रुग्णांसाठी अर्ध्या रात्रीही आवाज दिल्यास मी सेवा देण्यास तत्पर असेल, तसेच सेवा आणि सुविधेत थोडीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तक्रार येताच, थेट कारवाई केली जाईल. नागरिकांनीही त्रुटी लक्षात आणून दिल्यास त्यात सुधारणा केल्या जातील.

डॉ.सुरेश साबळे, नवे जिल्हा शल्य चिकित्सक बीड.

===Photopath===

100621\10_2_bed_14_10062021_14.jpeg~100621\10_2_bed_15_10062021_14.jpg

===Caption===

पदभार स्विकारण्यापूर्वी डॉ.सुरेश साबळे यांनी कोरेाना वॉर्डमध्ये जावून रूग्णांची चौकशी केली. सोबत डॉ.मधुकर घुबडे, डॉ.देशपांडे, डॉ.वाघमारे, डॉ.गांडगे आदी होते.~डॉ.सुरेश साबळे

Web Title: Gitten removed from CS post; Suresh Sable takes over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.