व्यापारपेठ उघडण्याची सवलत द्या; महासंघाची प्रशासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:33 AM2021-04-08T04:33:20+5:302021-04-08T04:33:20+5:30

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॕॅकडाऊन लावण्यात आले आहे. अत्यावाश्यक सेवा, किराणा, भाजीपाला, फळे, कृषी साहित्य ही दुकाने सोमवार ...

Give concessions to open a market; Demand of the federation to the administration | व्यापारपेठ उघडण्याची सवलत द्या; महासंघाची प्रशासनाकडे मागणी

व्यापारपेठ उघडण्याची सवलत द्या; महासंघाची प्रशासनाकडे मागणी

Next

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॕॅकडाऊन लावण्यात आले आहे. अत्यावाश्यक सेवा, किराणा, भाजीपाला, फळे, कृषी साहित्य ही दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. मात्र, इतर व्यावसायिकांवर हा निर्णय अन्यायाकारक आहे. यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत मंदीची लाट असल्याने पाच दिवस इतर व्यवसाय दिलेल्या वेळेत उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी धारूर तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. हे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष अशोकराव जाधव, सराफ संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ निर्मळ, मोबाइल असोसिएशनचे नितीन शिनगारे, जनरल स्टोअर्सचे सचिन चिद्रवार, सुनील खिंडरे, नीलेश डुबे, धीरज भावठाणकर, गजानन डुबे, राजेश रुद्रवार आदी उपस्थित होते.

===Photopath===

070421\anil mhajan_img-20210407-wa0071_14.jpg

===Caption===

प्रशासनाने सर्व परिस्थिती पाहून तात्काळ सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी धारूर तालुका व्यापारी महासंघाचे वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Give concessions to open a market; Demand of the federation to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.