संधी द्या, विकासाची जबाबदारी माझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 01:03 AM2019-09-12T01:03:59+5:302019-09-12T01:04:34+5:30

आहेर धानोरा आणि वरवटी हे दोन्ही गावे शिवसेनेवर निस्सीम प्रेम करणारे आहेत. या गावात शिवसेनेशिवाय कोणत्याही पक्षाला थारा मिळत नाही. दोन्ही गावात सभागृहाची मागणी होती ती पूर्ण झाली आहे. आता सेवेची संधी द्या, पुढच्या विकासाची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाही राज्याचे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.

Give me the opportunity, it's my responsibility to develop | संधी द्या, विकासाची जबाबदारी माझी

संधी द्या, विकासाची जबाबदारी माझी

Next
ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर यांचे प्रतिपादन : आहेर धानोरा, वरवटीत सभागृहाचे लोकार्पण

बीड : आहेर धानोरा आणि वरवटी हे दोन्ही गावे शिवसेनेवर निस्सीम प्रेम करणारे आहेत. या गावात शिवसेनेशिवाय कोणत्याही पक्षाला थारा मिळत नाही. दोन्ही गावात सभागृहाची मागणी होती ती पूर्ण झाली आहे. आता सेवेची संधी द्या, पुढच्या विकासाची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाही राज्याचे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली.
आहेर धानोरा येथील हनुमान मंदिराचे भव्य सभागृह आणि वरवटी येथील विठ्ठल मंदिर भव्य सभागृहाचा लोकार्पण सोहळा जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते मंगळवारी पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, विलास बडगे, दिनकर कदम, वैजिनाथ तांदळे, बाळासाहेब अंबुरे, सखाराम मस्के, नितीन धांडे, विनोद मुळूक, गोरख शिंगण, सागर बहीर, सुशिल पिंगळे, अशिष मस्के, अमोल बागलाने, रतन गुजर, त्रिंबक दिवे, गणेशमस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविक विनोद इंगोले यांनी तर दिनकर कदम, सचिन मुळूक, बाळासाहेब पिंगळे, कुंडलिक खांडे यांनी मनोगत व्यक्त करत जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदार संघासाठी आणि जिल्हयासाठी जी कामे केली आहेत, ती आजही साक्षीदार आहेत. आतापर्यत शिवसेनेच्या हाती सत्ता असतानाही विकास करू शकलो नाहीत, तो विकास जयदत्त क्षीरसागरांच्या माध्यमातून शिवसेना पूर्ण करून दाखविणार आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी क्षीरसागरांना मोठ्या मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दोन्ही गावात झालेल्या लोकार्पण सोहळ्यानंतर मोठ्या संख्येने आलेल्या जनसमुदायासमोर बोलतांना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आहेर धानोरा आणि वरवटी ही दोन्ही गावे अनेक वर्षापासून शिवसेनेशी बांधील आहेत. या गावात एकनिष्ठ असलेला शिवसेनेचा मतदार कधीही दुसऱ्याला मतदान करीत नाही. मतदान मिळेल की नाही हे न पाहता या दोन्ही गावात आवश्यक असलेल्या सभागृहांना आपण निधी उपलब्ध करून दिला आणि योगायोगाने दोन्ही गावच्या निष्ठेच्या असलेल्या पक्षात आपला प्रवेश झाला.त्यामुळे ही दोन्ही गावे आता शिवसेनेची झाली आहेत. गावासाठी कोणी काय केलं हे मतदान करतांना तपासून पहा, सेनेतील जुन्या नव्याचा वाद मिटवून मजबूत असलेला शिवसेना हा पक्ष पुन्हा एकदा दाखवा. या दोन्ही गावचा संपर्क बीड शहराशी जोडलेला आहे.
दूध व्यवसाय, पारंपरिक शेती करत येथील ग्रामस्थ गुण्यागोविंदाने राहतात. आगामी काळात ज्या मागण्या आहेत, त्याची पुर्तता करूनच दाखवू असे सांगून मला सेवेची संधी द्या विकासाची जबाबदारी मी निश्चितपणे घेतो, असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी धानोरा येथे त्रिंबक दिवे, धनवडे, दत्ता आवळे, अनिल इंगोले, सुशिल इंगोले तर वरवटर येथे सुनील कोटुळे, नामदेव कोटुळे, धनराज टेलर, भीमराव शिंदे, अप्पासाहेब सुकवसे, गहिनीनाथ पटे, अरूण शिंदे, काका खोटे, संजय मस्के, पंडित घुमरे, दिलीप शिेदे, प्रशांत शिंदे, रमेश कोटुळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Give me the opportunity, it's my responsibility to develop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.