औषधे वेळेवर द्या, रक्त तपासणी करा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:34 AM2021-04-27T04:34:27+5:302021-04-27T04:34:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुसळंब : पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे ग्रामीण भागातील पहिले कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुसळंब : पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे ग्रामीण भागातील पहिले कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरला रविवारी रात्री जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी अचानक भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांनी रूग्णांशीही संवाद साधला. तसेच रूग्णांना औषधे वेळेवर द्या, रक्ताची तपासणी करा, अशा सूचना डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दिल्या.
कुसळंब येथे दोन दिवसांपूर्वीच ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. आरोग्य विभाग, मानवलोक संस्था आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून याला सुरूवात झाली. सध्या या सेंटरमध्ये कुसळंबसह परिसरातील गावांमधील २४ कोरोनाबाधित रूग्ण दाखल आहेत. याच अनुषंगाने रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी अचानक येथे भेट दिली. यावेळी सेंटरचा राऊंड घेण्यासह रूग्णांशीही संवाद साधला. जेवण, औषधे, तपासण्या वेळेवर होतात का, याचा आढावा घेण्यासह काही त्रुटी सुधारण्याबाबत सूचना केल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. माेहित कागदे, डॉ. संदीप यमगर, डॉ. रूपाली कुमरे, परिचारिका मनीषा जाधव, धम्मराज गायकवाड, संभाजी पवार, सारिका कैवाडे, संजय पवार, आबासाहेब पवार, बाळासाहेब पवार, आदी उपस्थित होते.
===Photopath===
250421\101625_2_bed_15_25042021_14.jpeg
===Caption===
कुसळंब आरोग्य केंद्रात रूग्णांच्या समस्या जाणून घेताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार आदी.