छोट्या समस्येवर सोल्युशन दिले तरी जगातले मोठे संशोधन ठरू शकते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:24 AM2019-02-28T00:24:45+5:302019-02-28T00:28:00+5:30

महाराष्टÑाचा रॅँचो, युवा संशोधक, विविध १८ पेटंटचे हक्क प्राप्त करणारा अजिंक्य कोत्तावार बीडमध्ये विज्ञान उपक्रमांतर्गत आला होता. विज्ञानाबद्दल भावी पिढीची जिज्ञासा, कुतुहल, संशोधन वृत्ती वाढीस लागावी या बाबींवर लोकमतने संवाद साधला.

Given the solution to a small issue, it can be the world's largest research! | छोट्या समस्येवर सोल्युशन दिले तरी जगातले मोठे संशोधन ठरू शकते !

छोट्या समस्येवर सोल्युशन दिले तरी जगातले मोठे संशोधन ठरू शकते !

googlenewsNext
ठळक मुद्देअजिंक्य कोत्तावार : १८ पेटंटचे हक्क प्राप्त करणारा युवा संशोधक

अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : महाराष्टचा रॅँचो, युवा संशोधक, विविध १८ पेटंटचे हक्क प्राप्त करणारा अजिंक्य कोत्तावार बीडमध्येविज्ञान उपक्रमांतर्गत आला होता. विज्ञानाबद्दल भावी पिढीची जिज्ञासा, कुतुहल, संशोधन वृत्ती वाढीस लागावी या बाबींवर लोकमतने संवाद साधला.
यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील अजिंक्यचे वडील रविंद्र कोत्तावार सूतगिरणीत नोकरी करतात. तर आई क्षमा या शिक्षिका आहेत. अजिंक्य नागपूरमध्ये ज्ञान फाऊंडेशनच्या माध्यमातून मुलांमध्ये विज्ञानवृत्ती वाढण्यासाठी कार्य करत आहे. गुण कमी मिळाले तरी विद्यार्थी क्रियेटिव्ह असतो. ‘छोट्या समस्येवर सोल्युशन दिले तरी ते जगातले मोठे संशोधन ठरू शकते’, असे अजिंक्यचे मत आहे.
प्रश्न : शिक्षणानंतर काय केले?
उत्तर : शिक्षण घेतातानच लोकांचे, समाजजीवनाचे निरीक्षण केले. आपण काही मदत करु शकतो का? हा प्रश्न होता. १५ वर्षांपासून संशोधन क्षेत्रात आहे.
प्रश्न : ज्ञान फाऊंडेशन नेमके काय काम करते?
उत्तर : प्रत्येक मुलांमध्ये क्रियेटिव्ह दडलेले असते. मात्र वर्तमान पुस्तकी शिक्षण प्रणालीतून ते बाहेर येत नाही. मग शिक्षण कशासाठी घ्यायचे? शिक्षणाचा उपयोग व्यवहारीक जीवनात कसा होतो, हे महत्वाचे आहे. तो कसा करावा हे ज्ञान फाऊंडेशन सुचवते. तिथे पुस्तक वापरत नाहीत. टाकाऊपासून तसेच कचऱ्यापासून निर्मिती तसेच संशोधनासाठी मार्गदर्शन केले जाते. सध्या ४०० मुले आहेत.
प्रश्न : आजच्या विद्यार्थ्यांबद्दल काय वाटते? आपले फाऊंडेशन किती वर्षापासून काम करते?
उत्तर : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये क्षमता आहे, ती बाहेर येत नाही. गुण मिळाले नसले तरी तो क्रियेटिव्ह असतो. अशा विद्यार्थ्यांना फाऊंडेशन मार्गदर्शन करत आहे. तर १० वर्षांपासून ४५ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलो आहे.
प्रश्न : तुमचे कोणते संशोधन महत्वाचे वाटते?
उत्तर : पेट्रोल- डिझेलवर चालणारी गाडी, एकाच इंजिनमध्ये हे इंधन टाकता येते. पाच वर्षांपर्यंत एक रुपयाही खर्च येणार नाही असे वापरता येणारे वॉटर फिल्टर, चारचाकी हायब्रीड वाहन इ टू ओ कारमध्ये सुधारणा केली आहे. २ लिटर पेट्रोल ३०० किलोमीटरपर्यंत वापरता येते. पेट्रोल- करंटचे संयोग साधून इलेक्ट्रीक कार ज्याची बॅटरी १२० कि. मी. एवरेज देते. छतावरील पाणी थेट झऱ्यापर्यंत पोहचविणारा रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट जो कार्यान्वित केल्यानंतर ५ वर्षापर्यंत काहीच होत नाही. असे अनेक प्रोजक्ट आहेत. १८ पेटंट आपल्याकडे आहे.
प्रश्न : मुलांचे प्रोजेक्ट शाळा, प्रदर्शन, स्पर्धेपुरतेच मर्यादीत राहतात, तुम्हाला काय वाटते?
उत्तर : मुले इन्सपायर होतात. काम करतात. पण प्रोजेक्ट आणि प्रोडक्टमधला फरक इतकाच पुरेसा नाही. मुलांच्या नवनिर्मितीला प्रोडक्टमध्ये रुपांतरित करणे आवश्यक आहे. यासाठी रिसर्च सेल उभारण्याची गरज आहे.

शाळांमधील प्रयोगशाळेचे स्वरुप काळानुरुप आणि गरजेनुसार बदलले पाहिजे. तेथे मुलांना शिकू द्या, शिकवू द्या, त्यामुळे सभाधीटपणा, ज्ञान वाढेल. लॅबमध्ये आजुबाजुला प्रश्न असले तर मुले सोल्युशन देऊ शकतात. शाळांनी मुलांना त्यांच्या गुणांपेक्षा जीवनात उपयोगी होण्यासाठी शिकवावे.

Web Title: Given the solution to a small issue, it can be the world's largest research!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.