व्याख्याते ज्ञानदेव काशिद यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:02 AM2021-02-06T05:02:00+5:302021-02-06T05:02:00+5:30
बीड : येथील सुप्रसिद्ध व्याख्याते ज्ञानदेव काशिद यांच्या सामाजिक प्रबोधन कार्याबद्दल त्यांना पाटोदा येथील राजे संभाजी प्रतिष्ठानकडून गौरविण्यात आले. ...
बीड : येथील सुप्रसिद्ध व्याख्याते ज्ञानदेव काशिद यांच्या सामाजिक प्रबोधन कार्याबद्दल त्यांना पाटोदा येथील राजे संभाजी प्रतिष्ठानकडून गौरविण्यात आले. यावेळी कीर्तनकार रामकृष्ण रंधवे महाराज, कीर्तनकार राधा महाराज, युवक नेते जयदत्त धस, माजी सभापती महेंद्र गर्जे, प्रथम नगराध्यक्ष बळीराम पोटे, जब्बार पठाण, नगरसेवक संदीप जाधव, सुभाष पाखरे, शेख जिलानी, सुरेखा खेडकर, एल. आर. जाधव, प्रतिष्ठानचे प्रमुख राजू जाधव आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
बेशिस्त पार्किंगचा वाहतुकीला अडथळा
बीड : शहरातील विविध बँक, शासकीय कार्यालयासमोर दुचाकीची अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, वाहनकोंडी होत आहे. कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
रायमोहा : शिरुर कासार तालुक्यातील रायमोहा आणि परिसरात वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित होत आहे. या प्रकाराला ग्रामस्थ वैतागले आहेत. महावितरण अधिकाऱ्यांना वेळोवेळी याची माहिती दिली जाते. तात्पुरती कामे केली जातात मात्र, परिस्थिती जैसे थे राहत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.