गोदावरीला २२ दिवसानंतर पुन्हा पूर; राक्षसभुवन शनी मंदिर, पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 11:33 AM2021-09-30T11:33:56+5:302021-09-30T11:34:10+5:30

4 सप्टेंबर रोजी तालुक्यातील सर्वच भागात रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी नदी कठी असलेल्या तिर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर व तिर्थक्षेत्र आत्मतिर्थ पांचाळेश्वर दत्त मंदिर पाण्याखाली गेले होते.

Godavari floods again after 22 days; Rakshasabhuvan Shani Mandir, Datta Mandir at Panchaleshwar under water | गोदावरीला २२ दिवसानंतर पुन्हा पूर; राक्षसभुवन शनी मंदिर, पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर पाण्याखाली

गोदावरीला २२ दिवसानंतर पुन्हा पूर; राक्षसभुवन शनी मंदिर, पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर पाण्याखाली

googlenewsNext

- सखाराम शिंदे
गेवराई : जायकवाडी धरणातुन बुधवार रोजी गोदावरी नदीत 90 हजार क्युसेस पाणी सोडलेल्यामुळे तालुक्यातील राक्षसभुवन येथील तिर्थक्षेत्र शनि महाराज मंदिर व पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर पुन्हा 22 दिवसा नंतर पुन्हा पाण्याखाली गेले आहे.सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.

4 सप्टेंबर रोजी तालुक्यातील सर्वच भागात रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी नदी कठी असलेल्या तिर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर व तिर्थक्षेत्र आत्मतिर्थ पांचाळेश्वर दत्त मंदिर पाण्याखाली गेले होते.परत बुधवार रोजी पैठण येथील जायकवाडी धरण 95 % भरल्याने त्यातुन 90 हजार क्युसेस पाणी गोदावरी नदीत सोडल्याने व आधीच नदी पात्रात पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने यात आणखी भर पडल्याने तालुक्यातील तिर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर तसेच पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त मंदिर 22 दिवसा नंतर पुन्हा पाण्याखाली गेले आहे.

सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. गोदावरी नदीला पुर आल्याने पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त मंदिर व शनी मंदिर पाण्याखाली गेले असल्याने कोणीही दर्शनाला येवु नये असे आवाहन पांचाळेश्वर येथील महंत विजयराज गुर्जर बाबा,रवी कोठी तसेच राक्षसभुवन येथील संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र पाठक  यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
 
पैठण येथील जायकवाडी धरण 95 % भरल्याने धरणाचे 18 दरवाजे उघडुन त्यातुन गुरुवार  रोजी पहाटे 4 वाजता 90 हजार क्युसेस पाणी गोदावरीत नदीत सोडल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे.तरी नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये असे आवाहन प्रभारी तहसीलदार शामसुंदर रामदासी यांनी सांगितले.

Web Title: Godavari floods again after 22 days; Rakshasabhuvan Shani Mandir, Datta Mandir at Panchaleshwar under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.