जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने गोदावरीस पूर; पाचांळेश्वर, शनी मंदिर पाण्याखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 05:32 PM2019-10-25T17:32:56+5:302019-10-25T17:37:17+5:30

दोन महिन्यात तिस-यांदा पाचांळेश्वर मंदिर पाण्याखाली आले तर राक्षसभुवनच्या शनीमंदिर दुस-या मजल्यावर पाणी

Godavari floods due to increase in water supply from Jayakwadi dam; Panchaleshwar and shani temple under water | जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने गोदावरीस पूर; पाचांळेश्वर, शनी मंदिर पाण्याखाली 

जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने गोदावरीस पूर; पाचांळेश्वर, शनी मंदिर पाण्याखाली 

googlenewsNext

गेवराई : परतीचा पाऊस मोठ्याप्रमाणावर सुरु असल्याने पैठण येथील नाथसागर धरणात वरिल धरणातून पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे गुरुवारी रात्री 3 वाजेच्या सुमारास धरणाचे 16 दरवाजे अडीज फुटाने उघडून गोदावरी नदीपात्रात 43509 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. विसर्गामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून दोन महिन्यात तिस-यांदा पाचांळेश्वर मंदिर पाण्याखाली आले तर राक्षसभुवनच्या शनीमंदिर दुस-या मजल्यावर पाणी आले आहे.तब्बल 12 वर्षा नंतर गोदावरी नदी तब्बल तिस-यादां दुथडी भरून वाहत आहे. 

जायकवाडी धरणातून उजवा व डावा कालवा, जलविद्युत केद्रांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून पाणी सोडलेले आहे. गुरुवारी धरणाचे 10,11,12,13,14,15,16,17,20,21,22,23,24,25,26,27 असे १६  दरवाजे आवक वाढल्याने उघडण्यात आले. गोदावरी नदी पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील 32 गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. वाढलेल्या पाणी पातळीमुळे तालुक्यातील पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त  मंदिर पुर्ण पाण्याखाली गेले आहे. तसेच शनिच्या साडेतीन पिठा पैकी एक पिठ असलेल्या राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिरातील दुस-या मजल्यावर पाणी येऊन मूर्ती पाण्याखाली गेली आहे.

नदी काठच्या गावांना धोक्याचा इशारा 
नदी पात्रात नाथसागरातुन 43509 क्युसेक पाणी सोडल्या मुळे तालुक्यातील 32 गावातील नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असुन नागरिकांनी नदी पात्रात जावु नये,जनावरे पाण्यात सोडु नये तसेच महसुलचे पथक तौनात ठेवले आहे असे आवहान तहसिलदार धोंडिबा गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Godavari floods due to increase in water supply from Jayakwadi dam; Panchaleshwar and shani temple under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.