गोदावरी पात्रातील गेवराई येथील राक्षसभुवन मंदिर गेले पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 06:56 PM2017-09-22T18:56:45+5:302017-09-22T18:59:30+5:30

जायकवाडी धरण 95 %  भरले असुन त्यामुळे शुक्रवार रोजी रात्री धरणातुन 15 हजार क्युसेसे पाणी गोदावरी नदी पात्रात सोडल्याने तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या तिर्थक्षेत्र पांचाळेश्वर व राक्षसभुवन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

The goddess of Godavari, Gevairai, has gone under water | गोदावरी पात्रातील गेवराई येथील राक्षसभुवन मंदिर गेले पाण्याखाली

गोदावरी पात्रातील गेवराई येथील राक्षसभुवन मंदिर गेले पाण्याखाली

googlenewsNext

गेवराई ( बीड ) , दि. २२ : जायकवाडी धरण 95 %  भरले असुन त्यामुळे शुक्रवार रोजी रात्री धरणातुन 15 हजार क्युसेसे पाणी गोदावरी नदी पात्रात सोडल्याने तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या तिर्थक्षेत्र पांचाळेश्वर व राक्षसभुवन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

जायकवाडी धरणातुन शुक्रवार रोजी रात्री 15 हजार क्युसेसे पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तालुक्यातील तिर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील महानुभव पंथाचे आत्मतिर्थ पूर्णतः पाण्या खाली गेले आहे. तर शनिच्या साडेतीन पिठा पैकी एक असलेल्या राक्षसभुवन येथील शनीचे मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. 

या आधी 2006 व 2007 रोजी जायकवाडी धरणातुन 2 लाख क्युसेस पाणी सोडले होते त्यावेळी अनेक गावात पाणी शिरले होते.नदी पात्रात जास्त प्रमाणात  पाणी सोडले तर तालुक्यातील कुरणपिपंरी, गुंतेगावं, पाचांळेश्वर, राक्षसभुवन, पाथरवाला, सावळेश्वर,म्हाळसपिपंळगावं ,सुरळेगावं, मिरगावं, पांढरी,राजापुर, काठोडा सह अनेक गावाना पाण्याचा धोका होवु शकतो. गोदावरी पात्रा जवळील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जावु नये,नागरिकांनी घाबरून न  जाता  सावधानी बाळगावी असे आवाहन तहसीलदार संजय पवार यांनी केले आहे.

Web Title: The goddess of Godavari, Gevairai, has gone under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.