गावाबाहेर जाताय... मग कुलुूपबंद घर सांभाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:36 AM2021-09-27T04:36:31+5:302021-09-27T04:36:31+5:30
पोलिसांचे आवाहन : शेजाऱ्यांना सांगा लक्ष ठेवायला बीड : जिल्ह्यात रात्री-अपरात्री अन् काही ठिकाणी दिवसाही घरे फोडण्याचे सत्र सुरू ...
पोलिसांचे आवाहन : शेजाऱ्यांना सांगा लक्ष ठेवायला
बीड : जिल्ह्यात रात्री-अपरात्री अन् काही ठिकाणी दिवसाही घरे फोडण्याचे सत्र सुरू आहे. त्यामुळे गावाबाहेर जाताना कुलूपबंद घरांच्या सुरक्षेची नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. कुलूप व्यवस्थित वापरा, शिवाय नजीकच्या ठाण्यात आणि शेजाऱ्यांनाही सांगूनच गावाला जा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा घरफोड्यांत वाढ झाली आहे. शहरात नोकरी व कामानिमित्त नागरिक घर बंद करून घराबाहेर पडतात, तर काहीजण गावी जातात. खेड्यांमध्ये शेतीकामासाठी लोक घरे बंद करतात. मात्र, अनेकदा कुलूप तकलादू असते. शेजाऱ्यांचे दुर्लक्ष असते. त्यामुळे चोरटे राजरोस हात साफ करतात. चोरी, घरफोडी टाळण्यासाठी खबरदारी हाच महत्त्वाचा उपाय आहे.
.... आठ महिन्यांत १४० घरफोड्या
जिल्ह्यात आठ महिन्यांत जिल्ह्यात १४० घरफोड्या झाल्या आहेत. आष्टी, अंबाजोगाई या भागांत घरफोड्यांचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांना सजग करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक ठाणे हद्दीतील दहा ठिकाणी पोस्टर लावले आहेत. त्याद्वारे घरफोडी, चोरी टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायची याची माहिती दिली आहे.
....
शंभरावर गुन्ह्यांचा अजून तपास सुरू
घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावरून अपेक्षित प्रयत्न होताना दिसत नाहीत. गुन्हे अन्वेषण पथके (डी.बी) सुस्त आहेत. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेवरच सगळी मदार आहे. अनेक नवे गुन्हेगार सक्रिय झाल्याने पोलिसांपुढे आव्हान कायम आहे.
...
कोणत्या वर्षांत किती घरफोड्या ? २०२९ २०२० २०२१
....
अनलॉकनंतर चोऱ्या वाढल्या
जिल्ह्यात २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये चोऱ्या दुपटीने वाढल्या आहेत. २०२० मध्ये जुलै अखेरपर्यंत ३३७ चोऱ्या झाल्या होत्या. चालूवर्षी जुलैअखेर हाच आकडा ७४१ इतका आहे. वाढलेल्या चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
...