परळीत बॅँकेतून पैसे काढून देतो म्हणून सोने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:27 AM2018-08-22T01:27:06+5:302018-08-22T01:27:40+5:30

Gold ran out of money as she took out money from the bank | परळीत बॅँकेतून पैसे काढून देतो म्हणून सोने पळविले

परळीत बॅँकेतून पैसे काढून देतो म्हणून सोने पळविले

Next

परळी : तुमच्या खात्यावर सौदी अरेबियातून ३५ हजार रूपये जमा झाले असून ते काढण्यासाठी बँक अधिकाऱ्यास सोने दाखवावे लागते, अशी थाप मारून १ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन एका अज्ञात इसमाने पोबारा केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी येथील एसबीआय बँकेसमोर घडला.

खतीजाबा शेख जफार (वय ६०, रा मलिकापुरा परळी) नामक महिलेने आपली फसवणूक झाल्याची फिर्याद परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे व संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व साक्षीदारांचे जवाब नोंदविले.

खतीजाबी शेख जफार ही महिला आपल्या मैत्रिणीसह येथील पोस्ट आॅफिसजवळ निराधार योजनेचे पैसे काढण्यासाठी आली होती. समोरच असलेल्या एसबीआय बँकेबाहेर उभा असलेला एक इसम त्यांच्याजवळ आला. सौदीतून तुमच्या खात्यावर पैसे आलेले असून ते काढण्यासाठी खतीजाबी यांना घरून सोने आणण्यास सांगितले.

सोने दाखवून तुम्हाला बँक अधिकारी पैसे देतील अशी थाप मारली. महिलेला काही सुधारलेच नाही. मैत्रिणीला बँकेतच थांबवून खतीजाबी यांनी घरी जाऊन स्वत: चे व मुलीचेही सोन्याचे दागिने आणले. तसेच नाकातील दागिना सोनाराकडून काढून आणला. हे सर्व दागिने बँकेजवळ आणले. त्यानंतर या इमाने महिलेस तहसील कार्यालयापासून फोटो आणण्यास सांगितले तर दुसºया महिलेस झेरॉक्स प्रत आणण्यास पाठविले. दोघींना पाठवून संधी साधत या इसमाने ते सोन्याचे दागिने घेऊन बँकेपासून धूम ठोकली.

खतीजाबी व त्यांची मैत्रीण परत बँकेजवळ आल्यानंतर तो माणूस गायब झाल्याचे समजले व फसविल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्र ार दिली. मंगळवारी बँकजवळील दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहेत.

Web Title: Gold ran out of money as she took out money from the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.