मित्राने दिला होता चांगला सल्ला; तरीही बालाजी, संकेतने केला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:55 PM2018-12-26T23:55:01+5:302018-12-26T23:55:29+5:30
सुमित वाघमारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांना त्यांच्या एका जिवलग मित्राने सुमितला मारु नका असा चांगला सल्ला दिला होता. मात्र, तरीही या दोघांनी १९ डिसेंबर रोजी सुमितवर हल्ला केला. हा प्रकार पोलीस तपासातून समोर येत आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वीच सुमितला मारण्याचा प्लॅन या आरोपींनी आखला होता, अशी माहिती पुढे येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सुमित वाघमारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांना त्यांच्या एका जिवलग मित्राने सुमितला मारु नका असा चांगला सल्ला दिला होता. मात्र, तरीही या दोघांनी १९ डिसेंबर रोजी सुमितवर हल्ला केला. हा प्रकार पोलीस तपासातून समोर येत आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वीच सुमितला मारण्याचा प्लॅन या आरोपींनी आखला होता, अशी माहिती पुढे येत आहे.
प्रेमप्रकरणातून सुमित वाघमारे या युवकाचा मेहुणा बालाजी व त्याचा मित्र संकेत याने धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. सुमितची पत्नी भाग्यश्रीच्या फिर्यादीवरुन पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी बालाजी, संकेत या मुख्य आरोपींसह कट रचणारे कृष्णा व गजानन रवींद्र क्षीरसागर यांना गजाआड केले होते. कृष्णा हा पोलिसांच्या कोठडीत आहे, तर बालाजी, गजानन व संकेत यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आता यापुढे तपासाला गती येणार असून, यातील सविस्तर माहिती पुढे येण्याची शक्यता आहे
वाहन, हत्यारे जप्त करणे बाकी
गुन्हा करण्यासाठी चारही आरोपींनी दुचाकी, जीप, कार या वाहनांचा वापर केला. तसेच सुमितला मारण्यासाठी वापरलेले हत्यारही जप्त करणे बाकी आहे. ते सहा दिवस कोठे फिरले ? याची माहितीही संकलित करणे बाकी आहे. त्या दृष्टीने तपास अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी मागितली आहे..
कलेक्टर कार्यालयावर काढला मोर्चा
खून करणाºया आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, पो. नि. शिवलाल पुर्भे यांची चौकशी करावी, भाग्यश्री वाघमारे हिला शासकीय सेवेत घ्यावे, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा, वाघमारे कुटुंबियांचे सरकारच्या वतीने पुनर्वसन करावे, हा निकाल लागेपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये सुमितची आई, पत्नी भाग्यश्री सह त्यांचे कुटूंब व विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव सहभागी झाले होते. जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.