भल्या पहाटे प्रशासनाचा वाळू माफियांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:14+5:302021-07-20T04:23:14+5:30

गेवराई : तालुक्यात अवैधरीत्या वाळू उपसा काही केल्या थांबत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यातच तालुक्यातील राक्षस भुवन ...

Good morning administration hit the sand mafia | भल्या पहाटे प्रशासनाचा वाळू माफियांना दणका

भल्या पहाटे प्रशासनाचा वाळू माफियांना दणका

Next

गेवराई : तालुक्यात अवैधरीत्या वाळू उपसा काही केल्या थांबत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यातच तालुक्यातील राक्षस भुवन येथे सोमवारी पहाटे प्रशासनाने कारवाई करीत वाळू माफियांना दणका दिला. उपसा करून वाळू वाहतुकीच्या उद्देशाने आलेले १५ हायवा चकलांबा ठाण्याच्या व महसूल विभागाच्या पथकाने पकडून जवळपास चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या हायवा राक्षस भुवन येथील शासकीय विश्रामगृहात लावण्यात आल्या आहेत.

तालुक्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत असल्याने, शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. याकडे कोणत्याच विभागाचे लक्ष नसल्याने वाळू माफियांची चांदी होत आहे. वाळू उपशाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर, तहसीलदार सचिन खाडे, चकलांबा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंझुर्डे यांच्या संयुक्त पथकाने तालुक्यातील राक्षस भुवन येथे सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. गोदावरी नदीजवळ वाळू उपसा आणि वाहतुकीच्या उद्देशाने आलेल्या १५ हायवा परिसरात दिसून आल्या. त्या ताब्यात घेत जवळपास ४ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तहसीलदार सचिन खाडे, पोलीस उपनिरीक्षक बप्पासाहेब झिंझुर्डे, तलाठी बाळासाहेब पखाले, माणिक पांढरे, जितेंद्र लेंडाळ, गोविंद ढाकणे, कुरूमकर, ठोके, क्षीरसागर, शरद कोंढरे, सचिन शिंदे, कोंढरे आदींनी ही कारवाई केली. पकडलेले वाहने राक्षस भुवन येथील शासकीय विश्रामगृह येथे लावण्यात आले असून, या प्रकरणी उशिरापर्यंत चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या कारवाईमुळे अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

190721\sakharam shinde_img-20210719-wa0035_14.jpg~190721\sakharam shinde_img-20210719-wa0033_14.jpg

Web Title: Good morning administration hit the sand mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.