बीड जिल्हावासीयांसाठी खुशखबर! वर्षाखेरपर्यंत अहमदनगर ते इगनवाडीपर्यंत धावणार रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 12:14 PM2023-09-30T12:14:13+5:302023-09-30T12:14:13+5:30
अहमदनगर- बीड -परळी हा एकूण २६१.२५ किमी लांबीचा प्रकल्प असून इगनवाडीपर्यंत तब्बल १३३.३ किमीचे काम लवकरच पूर्णत्वास येत आहे
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : वर्षभरापूर्वी अहमदनगर ते न्यू आष्टी रेल्वेची फेरी सुरू झाली आहे. दरम्यान, आता न्यू आष्टी ते इगनवाडी हा ६७.१२ कि.मी.चा रेल्वेमार्ग पूर्णत्वास येत आहे. वर्षाखेर अहमदनगर ते इगीनवाडीपर्यंत रेल्वे धावणार असल्याची माहिती आहे. अहमदनगर- बीड -परळी हा एकूण २६१.२५ किमी लांबीचा प्रकल्प असून इगनवाडीपर्यंत तब्बल १३३.३ किमीचे काम लवकरच पूर्णत्वास जात असल्याने बीड जिल्हावासियांनी आनंद व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांचे अधुरे राहिलेले स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात असून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर आहे. हा मार्ग एकूण २६१.२५ कि.मी. चा आहे. दरम्यान, २३ सप्टेंबर २०२२ रोजी अहमदनगर-न्यू आष्टी हा ६६.१८ किमीचा मार्ग पूर्ण झाला असून रेल्वेची नियमित फेरीही सुरू झाली. आता दुसऱ्या टप्यात न्यू आष्टी ते इनगवाडी हे हा ६७.१२ कि.मी.चा मार्ग या वर्षाअखेर पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. या रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत- ४८०८.१७ कोटी असून आजपर्यंतचा खर्च- ३६४६.०९ कोटी खर्च केले आहेत. या कामाची एकूण भौतिक प्रगती- ७८%, जमीन संपादन पूर्ण-१८२१ हेक्टर पैकी १८०६ हेक्टर म्हणजे ९९% जमिन संपादीत झाली आहे. आता इगनवाडी ते परळी हा १२७.९५ कि.मी. रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगती पथावर आहे.
न्यू आष्टी ते इनगवाडी आतापर्यंत पूर्ण झालेली कामे:
अर्थ वर्क-४३० LCum/४१८ LCum (९७%)
प्रमुख पूल- ६४/४९ (७७%)
छोटे पूल/RUB- ३०२/२४९ (८२%)
रोड ओव्हर ब्रिज- ६५/१४(२१%)
रोड अंडर ब्रिज- १३०/११० (८५%)
स्टेशन इमारती- २१/१० (२९%)
ट्रॅक लिंकिंग-२६१/११५ 115 किमी (४४%)
पॉवर लाईन क्रॉसिंग- ६२६/५६८(९१%)
बॅलास्ट पुरवठा-७.५२/६.४४ एलसीएम (८६%)
विद्युतीकरण- निविदा मंजूर झाली.