बीडमधील शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता; साेयाबीनसाठी सर्वच ८७ मंडळांनाही मंजुरी

By शिरीष शिंदे | Published: September 8, 2023 11:02 PM2023-09-08T23:02:53+5:302023-09-08T23:03:13+5:30

शुक्रवारी संयुक्त समितीने उर्वरित सोयाबीनच्या १३ मंडळांना ही अग्रिम देण्यावर शिक्कामोर्तब केले.

Good news for farmers in Beed; All 87 boards also approved for seeds | बीडमधील शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता; साेयाबीनसाठी सर्वच ८७ मंडळांनाही मंजुरी

बीडमधील शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता; साेयाबीनसाठी सर्वच ८७ मंडळांनाही मंजुरी

googlenewsNext

बीड: जिल्ह्यातील सोयाबीनसाठी ७३, मुगासाठी २२, तर उडदासाठी १३ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना विमा अग्रीम देण्याचे पीक विमा जिल्हास्तरीय संयुक्त समितीने मंजूर केले आहे. त्या संबंधीची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली आहे. शुक्रवारी संयुक्त समितीने उर्वरित सोयाबीनच्या १३ मंडळांना ही अग्रिम देण्यावर शिक्कामोर्तब केले.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीनच्या सर्व मंडळांना अग्रिम मंजुर झाला आहे.बीड जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून अनेक मंडळामध्ये २१ दिवस पावसाचा खंड आहे. त्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी आधी सोयाबीनसाठी ५२, मुगासाठी मुगासाठी २२, तर उडदासाठी १३ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय संयुक्त समितीने मंजूर केले आहे.

त्यानंतर समितीने सोयाबीनसाठी २१ महसूल मंडळांना मंजुरी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या बैठकीत संयुक्त समितीने उर्वरित १३ मंडळांना ही अग्रिम देण्यावर शिक्कामोर्तब केले. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा कृषी विभागाचे उपसंचालक बालासाहेब निकनवरे, एआयसी कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब इनकर, तालुका कृषी अधिकारी बी.आर. गंडे, वैजिनाथ राऊत आदी उपस्थित होते.

Web Title: Good news for farmers in Beed; All 87 boards also approved for seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.