आनंदवार्ता ! माजलगाव धरण ५० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 06:30 PM2020-07-24T18:30:33+5:302020-07-24T18:31:05+5:30

सरासरी पावसाच्या तुलनेत दिड महिन्यात ६५ टक्के पाऊस

Good news! Majalgaon dam is 50 percent full | आनंदवार्ता ! माजलगाव धरण ५० टक्के भरले

आनंदवार्ता ! माजलगाव धरण ५० टक्के भरले

Next
ठळक मुद्देधरण परिसरात  मागील आठवड्यात चांगल्या पावसाची नोंद

माजलगाव : माजलगाव धरण पाणलोट क्षेत्रात  मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसाची नोंद झाली असुन पावसाच्या सरासरीच्या तुलनेत  केवळ दिड महिन्यात ६५  टक्के ऐवढा पाऊस झाला असल्याने धरणाच्यापाणी पातळीतही मोठयाप्रमाणावर वाढ झाली असुन शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता ४७. ३७ टक्के पाणी पातळी झाल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे .

मान्सुनपुर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणात २ टक्के पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यानंतर वेळोवेळी दमदार पाऊस पडत राहिल्याने मागील दिड महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ६५ टक्के पाऊस पडला आहे. माजलगाव तालुक्याची पावसाची सरासरी ही ७०६ मी.मी.असुन यावर्षी २३ जुलै पर्यंत तालुक्यात ४२७.७० मी.मी.पावसाची नोंद झाली होती.

माजलगाव धरणात २ जून रोजी ४२७. ६८ मिटर ऐवढा पाणी साठा होता. यावेळी धरणात २०४. ५ दलघमी ऐवढा एकुन पाणी साठा होता तर ६२. ०० दलघमी ऐवढा उपयुक्त पाणी साठा होता व १९.८७ टक्के पाणी होते. २४ जुलै रोजी  दुपारी १ वाजता या धरणात ४२९.३८ मीटर ऐवढी पाणी पातळी असुन २८९.८० दलघमी ऐवढा पाणीसाठा असुन त्यातील उपयुक्त पाणी साठा हा १४७.८० दलघमी ऐवढा झाला असुन धरणात १७ हजार ६५७ क्युसेसने पाण्याची आवक सुरू होती . आता धरण भरण्यासाठी केवळ २. ४२ मीटर ऐवढया पाण्याची आवश्यकता आहे. धरणाची पाणी पातळी वाढल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे .

गेल्यावर्षी परतीच्या पावसाने भरले होते धरण
गेल्यावर्षी माजलगाव धरणाची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. पाणी पातळी जोत्याखाली गेल्याने व पावसाळा संपत आला तरी धरणाची पाणी पातळीत जास्त प्रमाणात वाढ न झाल्यामुळे धरणाची पाणीपातळी     जोत्या खालीच राहते की काय ? असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने केवळ चार दिवसात हे धरण टक्केवारीत येऊन पूर्णपणे भरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कालवा व नदी द्वारे अनेक वेळा पाणी सोडण्यात आले होते. गेल्या वर्षी धरण भरल्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती.

Web Title: Good news! Majalgaon dam is 50 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.