कोरोनाकाळातही गरोदर महिलांच्या तपासणीस चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:08+5:302021-07-18T04:24:08+5:30

माजलगाव : तालुक्यातील सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाकाळातही प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर महिलांकडून उपचारास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...

Good response to screening of pregnant women even in the coronal period | कोरोनाकाळातही गरोदर महिलांच्या तपासणीस चांगला प्रतिसाद

कोरोनाकाळातही गरोदर महिलांच्या तपासणीस चांगला प्रतिसाद

googlenewsNext

माजलगाव : तालुक्यातील सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाकाळातही प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर महिलांकडून उपचारास चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर महिन्याला ४० महिला तपासणीस येतात, तर या ठिकाणी ८०-९० ओपीडी होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळत आहे.

माजलगाव तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांपैकी पात्रुड येथील आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर ओपीडी होत असतात. परंतु सादोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे यापूर्वी सर्वसामान्य जनतेकडून पाठ फिरवली जायची. परंतु मागील दोन-तीन वर्षांत या प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जेदार सुविधा मिळत असल्याने या ठिकाणी रुग्णांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोनाकाळातही या ठिकाणी दररोज ८० ते ९० ओपीडी होत आहेत. आयपीडी ४-५, तर दर महिन्याला गरोदर महिलांच्या या ठिकाणी वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येतात. सध्या या ठिकाणी ४० महिला उपचार घेत आहेत. या महिलांना या ठिकाणी दर्जेदार सुविधा व मुबलक औषधी मिळत असल्याने या भागातील गरोदर महिलांचा खासगी रुग्णालयाकडे जाण्याचा कल कमी झाल्याचे काही महिलांनी सांगितले.

या ठिकाणी सध्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय पारगावकर व डॉ. रमेश घुंमरे काम पाहत आहे. त्यांच्या समवेत ज्ञानेश्वर मुळाटे, अशोक पवार, औषधनिर्माता गोविंद गोचडे, विकास नीळकंठ, नर्स म्हणून माळकरी एस. एस., वंजारे एस. बी., चवरे एस. व्ही., श्रीमती लोखंडे, सुनीता दळवी, सहारे साधना, काळे मॅडम, सुदाम उगले, शेख सय्यद, आशाताई व सर्व कर्मचारी वर्ग काम करत आहे.

-----

कोरोनाकाळातही सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांकडून व गरोदर महिलांकडून तपासणीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर औषधसाठा उपलब्ध आहे.---डॉ. रमेश घुमरे, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, सादोळा

Web Title: Good response to screening of pregnant women even in the coronal period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.