लोकनेत्याच्या दर्शनासाठी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:01 AM2017-12-13T01:01:53+5:302017-12-13T10:29:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपºयातून कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर ...

Gopinath Gadar to visit the Gopinath Gate, to meet the popular leader | लोकनेत्याच्या दर्शनासाठी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी

लोकनेत्याच्या दर्शनासाठी गोपीनाथ गडावर अलोट गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देदिंडी, पताका, रथयात्रा, संघर्ष ज्योत घेऊन कार्यकर्ते दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच राज्याच्या कानाकोपºयातून कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर गर्दी केली होती. विविध भागातून रथ, दिंडी, पताका, टाळ मृदंगासह येत मुंडे अनुयायी समाधी स्थळावर पोहोचले. पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुंडे यांची कुटुंबियांसह गडावर उपस्थिती होती. दरम्यान, वैद्यनाथ कारखान्यातील दुर्घटनेत मृत पावलेल्या कर्मचा-यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने जयंतीदिनी आयोजित केलेले सामाजिक उपक्र मांचे सर्व कार्यक्र म रद्द करून जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भगवानगड ते गोपीनाथ गड, नांदेड येथून हनुमान गड ते गोपीनाथ गड अशी अ‍ॅड. रमेश धात्रक यांची रथयात्रा आणि शिखर शिंगणापूर ते गोपीनाथगड अशी डॉ. राजेंद्र खाडे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष ज्योत घेऊन कार्यकर्ते गडावर आले होते. या दोन्ही यात्राचे पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी स्वागत केले.

सकाळी पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, प्रज्ञा मुंडे, डॉ. अमित पालवे, अ‍ॅड. यशश्री मुंडे, अगस्त्य खाडे आदी कुटुंबातील सदस्यांनी मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. नियोजित कार्यक्रमासाठी तयार असलेल्या मंडपात बसून पंकजा मुंडे व परिवाराने सर्वांचे अभिवादन स्वीकारले. वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाºयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, जि. प. अध्यक्षा सवीता गोल्हार, माजी आमदार केशवराव आंधळे, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राधा सानप, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदित्य सारडा, बंजारा नेते मांगीलाल चव्हाण, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, रामराव खेडकर, धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, विजय गोल्हार, संतोष हंगे, नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, सहाल चाऊस, पत्रकार अजित वरपे, विजयकुमार बंब, नरेंद्र कांकरिया, दिलीप खिस्ती आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Gopinath Gadar to visit the Gopinath Gate, to meet the popular leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.