'मुंडेजी मेरे मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी', राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोपीनाथ गडावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 11:30 AM2022-08-20T11:30:36+5:302022-08-20T11:32:26+5:30

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, आज त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे घेतले दर्शन

'Gopinath Munde was my friend, his memory will always come', Governor Bhagat Singh Koshyari on Gopinath Gada in Parali | 'मुंडेजी मेरे मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी', राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोपीनाथ गडावर

'मुंडेजी मेरे मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी', राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोपीनाथ गडावर

googlenewsNext

परळी (बीड ): 'गोपीनाथ मुंडे मेरे सहयोगी एवं मित्र थे, लोकनेता के रूप में उनकी याद हमेशा आती रहेगी', अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी जाग्या केल्या. राज्यपाल कोश्यारी सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 

राज्यपाल कोश्यारी यांचे काल परळी शहरात आगमन झाले. चेमरी विश्रामगृहात राज्यपालांचा  काल रात्री मुक्काम होता. आज सकाळी लातूरकडे जातांना राज्यपाल कोश्यारी यांनी गोपीनाथ गडाला आवर्जून भेट दिली. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. एका लेकीने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्मारक उभा केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे हे काम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे, अशा भावना राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केल्या. तसेच "मुंडेजी मेरे सहयोगी और मित्र थे, उनकी याद हमेशा आती रहेगी", अशा शब्दांत त्यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राज्यपालांनी पुतळा आणि गड परिसराची पाहणी केली. त्यानंतर ते लातूरकडे रवाना झाले.

वैद्यनाथ, योगेश्वरीचे घेतले दर्शन
दोन दिवसांच्या दौऱ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या दर्शन घेतले. त्यानंतर परळी येथे येऊन १२ ज्योतिर्लिंगांपैक्की एक असलेल्या वैद्यनाथाचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. शुक्रवारी रात्री राज्यपाल परळी येथे मुक्कामी होते.  

Web Title: 'Gopinath Munde was my friend, his memory will always come', Governor Bhagat Singh Koshyari on Gopinath Gada in Parali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.