गोर बंजारा समाजाचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:42+5:302021-09-11T04:34:42+5:30
बीड : गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथील १५ वर्षीय संदीप सोपान चव्हाण याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून ...
बीड : गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा येथील १५ वर्षीय संदीप सोपान चव्हाण याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून आरोपीला अटक करावी, यासह अन्य मागण्यांसाठी गोर बंजारा संघर्ष समितीच्या वतीने १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले .
७ ऑगस्ट रोजी संदीप चव्हाण बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह शेजारील शेतातील उसाच्या पिकात आढळला होता. त्यास शॉक देऊन संपवून मृतदेह उसात फेकल्याच्या तक्रारीवरुन पाच जणांवर तलवाडा ठाण्यात गुन्हा नोंद झालेला असून एक आरोपी अटकेत आहे. मात्र, उर्वरित आरोपी उजळमाथ्याने फिरत असूनही त्यांना पोलीस अटक करत नाहीत, असा आरोप करत गोर बंजारा संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या दिला. बंजारा व्हीजेए जातीचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्याची चौकशी करावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, २०२० चा पीकविमा शेतकऱ्यांना विनाअट मंजूर करून देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव प्रा.पी.टी.चव्हाण, पवन जाधव, अमर राठोड, अनिल राठोड, बी. एम. पवार, जीवन राठोड, सु.ब.पवार, अंकुश राठोड, रोहिदास चव्हाण, छगन चव्हाण, गोरख राठोड, रमेश चव्हाण, सचिन जाधव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
....
संदीप चव्हाणच्या शवविच्छेदन अहवालातील अभिप्राय आणि मूळ तक्रार यात तफावत आहे. त्यामुळे वस्तुस्थिती पाहून तपास करावा लागेल. यात शेतमालकास अटक केली आहे. सर्व बाबी पडताळून तपास करण्यात येणार आहे.
- स्वप्नील राठोड, उपअधीक्षक गेवराई
100921\10_2_bed_15_10092021_14.jpg
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासांठी गोर बंजारा संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले