शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:43 AM2018-10-29T00:43:14+5:302018-10-29T00:46:41+5:30

यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कामगार व माजी सैनिक कल्याण,कौशल्य विकास तथा भुकंप पुर्नवसन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

Governance will always be with farmers | शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार

शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार

Next
ठळक मुद्देसंभाजी पाटील निलंगेकर यांची ग्वाहीबीड जिल्ह्यात पीक पाहणी दौराअधिका-यांना सूचना; शेतक-यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतक-यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही कामगार व माजी सैनिक कल्याण,कौशल्य विकास तथा भुकंप पुर्नवसन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव व बीड तालुक्यातील वडवणी, ढोरवाडी, कान्हापूर, लक्ष्मीपूर, पोखरी, घाटसावळी, नित्रूड, पात्रूड, व धारु र या गावातील शिवारात थेट शेतीबांधावर जाऊन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पावसाअभावी नुकसान झालेल्या कापूस, सोयाबीन व तूर पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी एम.डी. सिंग, बीड भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रमेश आडसकर, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार, तहसीलदार सुनील पवार, चंद्रकांत फड, भूषण पाटील, धारूरचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंग हजारी, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष दत्ताभाऊ घोगरे, नगरसेवक सुरेश लोकरे, तहसीलदार झांझलवार, चंद्रकांत फड, माजलगावचे शहराध्यक्ष बबन साळुंके, तालुकाध्यक्ष हणमंत कदम, कॉ. सुभाष डाके, माजी सभापती नितिन नाईकनवरे, आदीसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे निलंगेकर यांचा हा पीक पाहणी दौरा दुपारी ३ च्या दरम्यान सुरु झाला होता. मात्र शेतक-यांच्या व्यथा ऐकताना व झालेला नुकसानीची माहिती घेत असताना अंधार पडला तरीही त्यांनी शेतक-यांच्या शिवारात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.
निलंगेकरांनी वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथील शंकर चव्हाण, बीड तालुक्यातील पोखरी येथील सखाराम बिटे, माजलगाव तालुक्यातील नित्रुड व पाथुर्डी येथील ज्ञानेश्वर जाधव व शेख अशरफ शेख महंमद, पात्रूड येथीलच शेख चांद यांच्याशी संवाद साधला.
या दौ-यादरम्यान विविध ठिकाणी शेतक-यांसह नागरिकांच्या शिष्टमंडळाने परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ दुष्काळ जाहीर करावा या आशयाचे निवेदन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना दिले.
शेतकरी नाराज : धारूर तालुक्याकडे पाठ

  • धारूर तालुका हा गंभीर दुष्काळाला तोंड देत असताना दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेले भूकंप व पुनर्वसनमंत्री संभाजीराव निंलगेकर हे तालुक्यात कुठेही पाहणी न करता या भागातून गेले.
  • धारूर तालुक्यातील डोंगराळ भागातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी अपेक्षित असताना मंत्री आले तसेच गेले. या भागातील पाण्यासाठी होणारे हाल, पीक परिस्थिती मंत्र्यांनी पहायला हवी होती, असे शेतकरी म्हणाले.

Web Title: Governance will always be with farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.