राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या बीड जिल्ह्यात; योगेश्वरी देवी, वैद्यनाथांचे घेणार दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 06:08 PM2022-08-18T18:08:36+5:302022-08-18T18:09:36+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या रात्री परळी येथे मुक्काम करणार
अंबाजोगाई ( बीड): महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शुक्रवारी (दि.१९) बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल शुक्रवारी दुपारी अंबाजोगाईत येणार असून परळीत मुक्कामी थांबणार आहेत. या दरम्यान, राज्यपाल अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी आणि परळी येथील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.
असा असेल कार्यक्रम:
शुक्रवार, दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.15 वाजता लातूर येथून अंबाजोगाई जि. बीडकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, ता. अंबाजोगाई येथे आगमन व जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेडक्रॉस सोसायटी यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीसाठी राखीव. दुपारी 1.30 ते 3.00 पर्यंत भोजनासाठी राखीव. दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथून योगेश्वरी देवी मंदिराकडे प्रयाण. दुपारी 3.05 वाजता योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई येथे दर्शनासाठी राखीव.
परळीत करणार मुक्काम
दुपारी 3.15 वाजता शासकीय वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 4.20 वाजता परळी वैजनाथ मंदिर, परळी येथे आगमन व दर्शनासाठी राखीव. दुपारी 4.40 वाजता परळी वैजनाथ मंदिर येथून शासकीय विश्रामगृह परळीकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह परळी येथे आगमन राखीव व मुक्काम. शनिवार, दिनांक 20 ऑगस्ट 2022 सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह, परळी जिल्हा बीड येथून लातूरकडे प्रयाण.