प्रतवारी घसरलेल्या कापसाला भाव मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:28+5:302021-01-25T04:34:28+5:30

पुलांना कठडे बसविण्याची मागणी अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे ...

Graded cotton did not fetch any price | प्रतवारी घसरलेल्या कापसाला भाव मिळेना

प्रतवारी घसरलेल्या कापसाला भाव मिळेना

Next

पुलांना कठडे बसविण्याची मागणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाइप तोडून भंगारमध्ये नेऊन विकले. त्यामुळे पुलाचे कठडे गायब झाले आहेत. यापूर्वीही कठडे नसलेल्या पुलावर अनेक वाहनचालक पडलेले आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पुलांना कठडे बसवावेत, अशी मागणी होत आहे.

बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात सावरकर चौक, प्रशांत नगर, शिवाजी चौक या भागात असणा-या चहाच्या टप-यांसमोर चहा पिण्यासाठी आलेले ग्राहक आपल्या दुचाकी गाड्या बिनधास्त रस्त्यावर लावून टप-यावर चहा पीत बसतात. गाड्या रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. बेशिस्त पार्किंग, समोर असणारे हातगाडे यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते.

चोरीच्या घटना वाढल्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून लहान-मोठ्या चो-यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबे घराला कुलूप लावून गेल्याने चोरट्यांना आयतेच रान मिळाले. परिणामी घरफोड्या वाढल्या. तसेच मोटारसायकलची शहरात मोठ्या प्रमाणात चोरी वाढली आहे. या वाढत्या चो-यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा व रात्रीची वाढवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

गॅस सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक

अंबाजोगाई : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबाजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबाजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जाते. हा प्रकार सातत्याने सुरू आहे. हे सिलिंडर प्रवास करणा-या ऑटोद्वारे इतरत्र नेऊन विकली जातात. पुरवठा विभागाने या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

-

मंडी बाजारात घाणीचे साम्राज्य

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज सकाळी विक्रीसाठी येणारा भाजीपाला विक्री झाल्यानंतर उरलेल्या भाज्या तिथेच रस्त्यावर टाकल्या जातात. या भाज्या खाण्यासाठी मोकाट जनावरे मंडी बाजारात असतात. रस्त्यावर पडलेल्या या भाज्यांमुळे दुर्गंधी व माशा बसून मोठ्या प्रमाणात घाण तयार होते. या परिसरात स्वच्छता ठेवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

Web Title: Graded cotton did not fetch any price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.